News Flash

सई- आदित्यची जोडी चाहत्यांमध्ये हिट; पण विराजस म्हणतो…

चाहत्याच्या प्रश्नावर विराजसने दिलं हटके उत्तर

काही मालिका या कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतात. सध्या छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आणि कलाकार आहेत, जे कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झाले आहेत. यातलीच एक मालिका म्हणजे माझा होशील ना. सध्या रंगतदार वळणावर असलेली ही मालिका कमी काळात तुफान लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या मालिकेमुळे अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे ही जोडी आता प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवू लागली आहे. त्यामुळे ऑनस्क्रीन असलेली ही जोडी ऑफस्क्रीनदेखील एकत्र यावी अशी मागणी आता चाहत्यांकडून होऊ लागली आहे.

अलिकडेच सई आणि आदित्य यांच्यावर चित्रीत झालेलं एक रोमॅण्टिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं चाहत्यांपर्यंत पोहोचावं यासाठी विराजसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. विशेष म्हणजे या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळण्याबरोबरच विराजस व गौतमी या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहायला मिळेल अशी मागणी चाहत्यांकडून होऊ लागली.सोबतच या जोडीला ‘मेड फॉर इच अदर’ हा टॅगदेखील चाहत्यांनी दिला आहे. यामध्येच एका चाहत्याने विराजसला त्याच्या भावी आयुष्याशी निगडीत एक अचंबित करणारा प्रश्न विचारला. मात्र, विराजसने अत्यंत शिताफीने उत्तर देत याविषयी व्यक्त होणं टाळलं.

“मालिकेत जसे सई आणि आदित्य ही जोडी एकमेकांसाठी पूरक आहे. तसंच विराजसच्या खऱ्या आयुष्यात काय सुरु आहे?” असा प्रश्न या चाहत्याने विचारला. सोबतच त्याने अभिनेत्री शिवानी रांगोळेचादेखील यात उल्लेख केला. मात्र, “मला आठवतंय पूर्वी लहान असताना लोक घराच्या छप्परांवरुन उड्या मारायचे आणि शक्तीमान येऊन त्यांना अलगद जमिनीवर उतरवेल अशा स्वप्नात रमायचे. पण रिल आणि रिअल आयुष्य हे दोन्ही वेगवेगळे असतात”, असं उत्तर विराजसने दिलं.

दरम्यान, विराजसच्या या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तर एकीकडे विराजस आणि गौतमी यांच्या नात्याविषयीदेखील अनेक चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. सध्या या जोडीबरोबरच माझा होशील ना ही मालिकादेखील तितक्याच रंजक वळणावर पोहोचली असून या मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. विशेष म्हणजे आता या मालिकेच सर्व भाग एक दिवस आधीच झी 5 क्लबवरदेखील प्रेक्षकांसाठी खास उपलब्ध करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 3:04 pm

Web Title: marathi tv show majha hoshil na new romantic song sai and aditya relation ssj 93
Next Stories
1 रामायणातील लक्ष्मणाने सेटवर केला होता मजेशीर प्रँक; फोटो पोस्ट करत सांगितली आठवण
2 “हिंदू धर्माला टार्गेट करणं थांबवा, अन्यथा…”; शक्तिमान बॉलिवूड चित्रपटांवर संतापला
3 ‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर लकी अली यांच्या गाण्यांची मैफिल
Just Now!
X