09 March 2021

News Flash

अनु- सिद्धार्थला कुटुंबीय देणारं ‘हे’ खास सरप्राइज

अनु-सिद्धार्थला घरातल्यांनी नेमकं का दिलं सरप्राइज?

अडीच- तीन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे या लॉकडाउनच्या काळातही कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची पुरेपूर काळजी घेतांना दिसत आहे. विशेष म्हणजे आता मालिकांचं चित्रीकरण सुरळीतपणे सुरु झाल्यामुळे दररोज प्रेक्षकांना नवीन भाग पाहायला मिळत आहे. यामध्येच लोकप्रिय मालिका ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे.त्यातच आता अनुसाठी सिद्धार्थने एक खास सरप्राइज प्लॅन केल्याचं पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या या मालिकेने अलिकडेच ५०० भागांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून अनु आणि सिद्धार्थ ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली आहे. त्यांच्यातील प्रेम, भांडणं, रुसवे-फुगवे यांच्यामुळे या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेत अनु- सिद्धार्थच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली असून घरातले या दोघांना खास सरप्राइज देणार आहेत.

अनु आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाचा वाढदिवस खास करण्यासाठी घरातल्या मंडळींनी एका पार्टीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे या दोघांसाठी हे एक सरप्राइज असणार आहे.

दरम्यान, सध्या ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. तत्ववादी कुटुंबात सम्राटची एण्ट्री झाल्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. त्यातच सान्वीने पुन्हा एकदा तत्ववादी कुटुंबात प्रवेश केला आहे. त्यामुळे सान्वी बदलली आहे का ? कुठली नवी खेळी ती खेळणार आहे ? अनु – सिद्धार्थ तिच्यावर पुन्हा विश्वास ठेऊ शकतील ? या प्रश्नांची उत्तर मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 5:44 pm

Web Title: marathi tv show sukhachya sarine he mann bavare anu and siddharth get surprise ssj 93
Next Stories
1 झी टॉकीजच्या विशेष चित्रपट महोत्सवात ‘या रे या सा रे या’
2 ‘अवघाचि संसार’ ही मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला..
3 रियापेक्षा सुशांत आणि सारामध्ये चांगले बाँडिंग होते- मित्राचा खुलासा
Just Now!
X