News Flash

आगळ्यावेगळ्या कथानकाचा ‘बबली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'बबली' म्हटल्यावर हिंदी चित्रपट 'बंटी और बबली'चा मनात विचार येणं साहजिकच आहे.

‘लॉकडाउन’ ‘अनलॉक’ होताच सतीश समुद्रे निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘बबली’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. विषयाचे वेगळेपण ही मराठी चित्रपटांची ओळख झाली आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या विषयावर आधारित हा चित्रपट आहे. ‘बबली’ म्हटल्यावर हिंदी चित्रपट ‘बंटी और बबली’चा मनात विचार येणं साहजिकच आहे. परंतु यांच्यात नावाव्यतिरिक्त काहीही साधर्म्य नाहीये.

या चित्रपटाची कथासुद्धा सतीश समुद्रे यांनीच लिहिली आहे. तर रॉबर्ट मेघा यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. या चित्रपटातील गाणी प्रकाश प्रभाकर यांनी संगीतबद्ध केली असून स्वप्नील बांदोडकर, मोहम्मद इरफान आणि वैशाली माडे यांनी ती गायली आहेत. यात भावनिक कथेला मनोरंजनाची फोडणी देण्यात आली आहे. यामध्ये कोणते कलाकार भूमिका साकारणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 5:44 pm

Web Title: marathi upcoming movie bubbly first look poster released ssv 92
Next Stories
1 मराठी ‘झॉलीवूड’चा विदेशात डंका; सातासमुद्रापार पटकावला पुरस्कार
2 “सुशांतच्या आत्महत्येबाबत कळताच अंकिताला फोन लावला आणि..”; प्रार्थना बेहरेनं व्यक्त केल्या भावना
3 “बॉलिवूड घराणेशाहीमुळे ग्रासलं आहे”; सुशांतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X