News Flash

‘मसान’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

तिच्याहून पाच वर्षांनी लहान असलेल्या रॅपरशी बांधणार लग्नगाठ

(संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र)

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत असून सोनम कपूर- आनंद अहुजा आणि रणवीर सिंग- दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या आघाडीच्या अभिनेत्रींशिवाय आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही अभिनेत्री आहे ‘मसान’ फेम श्वेता त्रिपाठी. ‘मसान’ या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षक- समीक्षकांकडून दाद मिळवणारी श्वेता जूनमध्ये विवाहबद्ध होणार आहे.

अभिनेता आणि रॅपर चैतन्य शर्मासोबत ती २९ जूनला लग्नगाठ बांधणार आहे. चैतन्य श्वेतापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. मोजके नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत गोव्यात श्वेता- चैतन्यचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

PHOTO : ‘शतदा प्रेम करावे’ मालिकेत आता सायलीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री 

एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच श्वेताची प्रेमकहाणी असून दिल्लीत एका नाटकाच्या निमित्ताने जात असताना फ्लाइटमध्ये या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली. या ओळखीचं हळूहळू मैत्रीत रुपांतर झालं. चैतन्यने अत्यंत रोमॅण्टिक पद्धतीने श्वेताला प्रपोज केलं. आपलं नवीन नाटक येत असल्याचं सांगून त्याने श्वेताला मुंबईतील कुकू क्लबमध्ये बोलावलं. त्यावेळी स्टेजवरच चैतन्यने श्वेताला प्रपोज केलं होतं.

shweta tripathi श्वेता त्रिपाठी, चैतन्य शर्मा

श्वेता त्रिपाठी ही दिल्लीचे माजी मुख्य सचिव पीके त्रिपाठी यांची कन्या आहे. ‘मसान’, ‘हरामखोर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर ‘क्या मस्त है लाइफ’ या मालिकेतही ती झळकली होती. तर रॅपर चैतन्य ‘स्लो चिता’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने ‘अल्ट बालाजी’च्या ‘बॉयगिरी’ या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2018 8:24 pm

Web Title: masaan fame actress shweta tripathi to marry rapper slowcheeta chaitanya sharma in goa
Next Stories
1 जान्हवीच्या ड्रेसवर अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या वेबसाइटला अर्जुनने सुनावले खडेबोल
2 ‘शतदा प्रेम करावे’ मालिकेत आता सायलीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
3 आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या ‘सायकल’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X