News Flash

‘यू अॅण्ड मी’ मध्ये पुन्हा जमणार शनाया-इशाची जोडी

शनाया पुन्हा एकदा तिचा हाच तोरा दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे.

सध्याच्या घडीला मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. राधिकाच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. तर गुरुनाथ मात्र अनेक आर्थिक संकटांमध्ये सापडला आहे. या साऱ्यामध्ये खलनायिका ठरत असलेली शनाया मात्र तिच्याच दुनियेमध्ये मशगुल असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शनायाचं हेच रुप प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. त्यामुळे शनाया पुन्हा एकदा तिचा हाच तोरा दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे.

शनाया लवकरच ‘यु अॅण्ड मी’ या नव्या व्हिडिओ अल्बममध्ये झळकणार असून यावेळी तिच्याबरोबर ‘नवऱ्याची बायको..’मधील तिची बेस्ट फ्रेंड इशादेखील झळकणार आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये झळकलेल्या या दोन मैत्रिणी त्यांची नवी इनिंग करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.

जरा सा कट्टा टाकू आता… जरासी बाते तेढीमेढी…
थोडासा किस्सा करू आता… थोडीशी यादे तेरी मेरी…
करू आम्ही मनमानिया… ऐसी है अपनी यारीया…

असं म्हणतं रसिका सुनील (शनाया)आणि आदिती द्रविड(इशा), आपला गहिरा दोस्ताना या अल्बमच्या माध्यमातून दाखवणार आहेत. या दोघींचा ‘यू अॅण्ड मी’ हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रेक्षक भेटीस येत असून व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.

दरम्यान, आदिती द्रविडने हे गाणं लिहीलं असून रसिका आणि आदिती या दोघींनीच ते गायलदेखील आहे. त्यामुळे या अल्बमच्या निमित्ताने रसिकामधील हा नवा गुणही प्रेक्षकांना दिसणार आहे. तर या गाण्यामध्ये फुलवा खामकर हिने नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 5:49 pm

Web Title: mazya navryachi bayako shanaya isha music album
Next Stories
1 Ind Vs Eng : …म्हणून पुजारा करू शकला मोठी खेळी!
2 ऋषभ पंत ठरला भारताकडून कसोटी सामना खेळणारा ***वा खेळाडू…
3 England vs India 3rd Test : विराट-अजिंक्यचा हल्लाबोल! पहिल्या दिवसअखेर भारत ६ बाद ३०७
Just Now!
X