28 February 2021

News Flash

या अभिनेत्याच्या चाहत्यांनी दिली प्रियांका चोप्राच्या बहिणीला बलात्काराची धमकी

जाणून घ्या कारण..

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहिण टॉलिवूड अभिनेत्री मीरा चोप्रा सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या मीराला एका अभिनेत्याच्या चाहत्यांनी बलात्काराची धमकी दिली आहे. इतकच नव्हे तर अनेकांनी ट्विटरवर तिला शिवीगाळ केला असून पॉर्न स्टार म्हटले आहे. मीराने या संदर्भादत सायबर पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. पण तिला अशी धमकी का देण्यात आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मीरा चोप्राने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी ट्विटरद्वारे संवाद साधला होता. यामध्ये तिने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. दरम्यान एका चाहत्याने तिला दाक्षिणात्य अभिनेता जूनियर एनटीआरशी संबंधीत एक प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देत मीराने मी जुनियर एनटीआरला ओळखत नाही असे म्हटले होते. ती जुनियर एनटीआरची चाहती नाही तर अभिनेता महेश बाबूची चाहती आहे असे तिने म्हटले होते.

मीराचे हे उत्तर ऐकून चाहत्यांना राग आला आणि त्यांनी मीराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चाहत्यांनी तिला बलात्काराची धमकी दिली असून तिला पॉर्न स्टार म्हटले आहे. एकीकडे जुनियर एनटीआरच्या चाहत्यांनी मीराला सोशल मीडियावर ट्रोल केले तर दुसरीकडी अनेकांनी तिला पाठिंबा दिला. ट्विटरवर #WeSupportMeeraChopra ट्रेंड होऊ लागला होता.

मीरा चोपडा ही बॉलिडूनची देसी गर्ल प्रियांका चोप्राची चुलत बहिण आहे. तिने आजवर तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१४मध्ये मीराने ‘गँग ऑफ घोस्ट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘सेक्शन ३७५’ या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय़ खन्ना आणि अभिनेते ऋचा चड्ढा मुख्य भूमिकेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:51 pm

Web Title: meera chopra receives rape threats on twitter avb 95
Next Stories
1 ट्विंकल खन्ना पाहतेय चक्रीवादळाची वाट; समुद्रकिनाऱ्यावर चहा घेताना व्हिडीओ व्हायरल
2 लॉकडाउनमध्ये अमृताने आईला दिलं खास बर्थ डे गिफ्ट; पाहा व्हिडीओ
3 ‘त्या’ जाहिराती का करतेस? आंदोलनात सहभागी झालेली करीना होतेय ट्रोल
Just Now!
X