01 December 2020

News Flash

“बॉलिवूड हे कुटुंब नाही कल्पना आहे”; मीराच्या ‘त्या’ पोस्टवर अभिनेत्याचा टोला

मीरा चोप्राने संपूर्ण बॉलिवूड कुटुंबाच्या वतीने सुशांतची माफी मागितली होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड कुटुंबाच्या वतीने अभिनेत्री मीरा चोप्राने सुशांतची माफी मागितली. तिच्या या माफी पत्रावर अभिनेता गुलशन देवैया याने प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड हे कुटुंब नाही, केवळ ही एक कल्पना आहे. असं म्हणत त्याने बॉलिवूडची पोलखोल केली आहे.

“बॉलिवूड इंडस्ट्री हे कुटुंब नाही. जर कोणी बॉलिवूडला कुटुंबाचा दर्जा देत असेल तर ही एक मोठी समस्या आहे. बॉलिवूड हे काम देणाऱ्या जागेचं एक काल्पनिक नाव आहे. मी इथे कोणावरही टीका करत नाही. जर कोणाला राग आला असेल तर त्याने माफ करावे.” अशा आशयाचं ट्विट करुन गुलशनने मीराच्या पोस्टवर उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 7:11 pm

Web Title: meera chopra sushant singh rajput gulshan devaiah mppg 94
Next Stories
1 ‘फक्त स्टार किड्स सोबत काम करतो’ धर्मा प्रोडक्शनने दिले होते आयुषमानला उत्तर
2 Video : सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन नव्याने वाद
3 सलमानवर अभिनव कश्यपने केलेल्या आरोपावर अरबाज म्हणाला, यावर…
Just Now!
X