News Flash

PadMan Song : ‘पॅडमॅन’ला सापडली त्याची ‘हू ब हू’

ही शिक्षिका निरागस लक्ष्मीकांतला ( अक्षय ) इंग्रजी बोलण्यास शिकवते.

पॅडमॅन, अक्षय कुमार, सोनम कपूर

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पॅडमॅन’ या अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटातील तिसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘हू ब हू’ असे गाण्याचे शीर्षक असून, यात मासिक पाळीदरम्यान महिलांनी पाळायच्या स्वच्छतेविषयी प्रचार करताना अक्षय म्हणजेच लक्ष्मीकांतला नवी मैत्रीण सापडते. ही मैत्रीण म्हणजेच सोनम कपूर. ‘जब एक हो रहे और एक ही मंजिल, मिल ही जाते है सफर में ऐसे लोग जो होते है हू ब हू’, असे बोल असलेल्या या गाण्यास अमित त्रिवेदीने गायले असून त्यास संगीतही दिले आहे. गाण्यातून चित्रपटातील कथा मांडण्याचे काम गीतकार कौसर मुनिरने केले आहे.

वाचा : जाणून घ्या, देव पटेलमुळे राधिका आपटे ट्रेण्डमध्ये येण्यामागचे कारण..

गाण्यास सुरुवात होताच अक्षय आणि सोनम साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमधील साम्य दिसून येते. आर बल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’मध्ये सोनम ही रिआ या शिक्षकेची भूमिका साकारत आहे. ही शिक्षिका निरागस लक्ष्मीकांतला ( अक्षय ) इंग्रजी बोलण्यास शिकवते. काहीसे एकमेकांसारखे असणारे हे गुरु-शिष्य गाण्यात एकमेकांकडे आकर्षित होत असल्याचेही गाण्यात पाहावयास मिळते. यादरम्यान ते महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व पटवून देताना दिसतात. मात्र, लक्ष्मीकांत आणि रिआमध्ये केवळ आकर्षण आहे की ते एकमेकांच्या प्रेमात पडतात ते २६ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

वाचा : प्रतिक बब्बर अडकणार लग्नाच्या बेडीत

स्त्री-स्वातंत्र्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ ठरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करणारे कोईम्बतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्यावर ‘पॅडमॅन’ चित्रपट आधारित आहे. राधिका आपटे चित्रपटात अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. ‘चिनी कम’ आणि ‘पा’ सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे आर. बाल्की यांनी ‘पॅडमॅन’चे दिग्दर्शन केले आहे. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना ही या चित्रपटाची निर्माती आहे. अरुणाचलम् यांना शोधण्यापासून चित्रपटासाठी तयार करण्यापर्यंतची महत्त्वाची जबाबदारी तिने पार पाडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2018 12:21 pm

Web Title: meet akshay kumars hu ba hu sonam kapoor in the latest song of padman
Next Stories
1 महाराष्ट्र बंदवर संतापले बॉलिवूडकर
2 प्रतिक बब्बर अडकणार लग्नाच्या बेडीत
3 जाणून घ्या, देव पटेलमुळे राधिका आपटे ट्रेण्डमध्ये येण्यामागचे कारण..
Just Now!
X