News Flash

अभिनेते चिरंजीवी यांना करोनाची लागण

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना करोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी ट्विटरद्वारे त्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. चिरंजीवी यांना करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. सध्या ते होम क्वारंटाइनमध्ये आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या वक्तींना चिरंजीवी यांनी करोना चाचणी करुन घेण्यास सांगितले आहे.

‘आचार्य चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यापूर्वी मी माझी करोना चाचणी करुन घेतली आणि ती चाचणी पॉझिटीव्ह आली. मला कोणतीही करोनाची लक्षणे जाणवत नव्हती. मी सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये जे लोकं माझ्या संपर्कात आले कृपया त्यांनी करोना चाचणी करुन घ्या. मी माझ्या प्रकृतीबाबत माहिती देत राहीन’ असे चिरंजीवी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

पाहा फोटो : १३०० कोटींच्या संपत्तीचे मालक असलेल्या सुपरस्टार चिरंजीवी यांचे घर पाहिलेत का?

चिरंजीवी हे लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार होते. पण त्यापूर्वी त्यांनी करोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. आता चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. ‘आचार्य’ या चित्रपटात चिरंजीवी हे दोन भूमिका साकारणार आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची घोषणा करताच उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण आता चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 1:10 pm

Web Title: megastar chiranjeevi tests positive for coronavirus avb 95
Next Stories
1 कमला हॅरिस यांच्याविषयी मल्लिका शेरावतने ११ वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी
2 अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘लक्ष्मी’ आज प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या प्रदर्शनाची वेळ
3 फक्त शाहरुखसाठी आमिरने केलं ‘हे’ काम
Just Now!
X