जगभरात पसरलेल्या करोनाबाबत जागृती करण्यासाठी मनोरंजनविश्वातून अनोखे फंडे वापरले जात आहे.  देव करो ना तुमच्या वाटय़ाला पाचोळा येवो ना बाभळी (संगीत देवबाभळी), दादा एक गूड न्यूज आहे ऑफिसला १५ दिवस सुट्टी आहे, नेटसम्राट सा वर्क फ्रॉम होणे शक्य नाही असे संदेश लिहीलेले फलक समाजमाध्यमावर धुमाकूळ घालत आहेत. रसिकहो काळजी घ्या या हॅशटॅगखाली  लोकप्रिय नाटक आणि चित्रपटाचे शीर्षक गुंफून वर्क फ्रॉम  होम, स्वच्छतेचे महत्व सांगणाऱ्या संदेशातून करोनाविषयी जनजागृती केली जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव नाटय़ – चित्रपटगृहे बंद ठेवण्याबरोबरच मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले आहे. करोनामुळे सर्व जनजीवन ठप्प झाले असताना कलाकार आणि दिग्दर्शक पोवाडा, चित्रफीत, कविता यांच्या माध्यमातून करोनाविषयी जनजागृती करत आहे.   देव करो ना तुमच्या वाटय़ाला पाचोळा येवो ना बाभळी (संगीत देवबाभळी), अश्रूंची फुले करायची तर जनता कर्फ्यू पाळा जनसंपर्क टाळा  (अश्रूंची झाली फुले),दादा एक गुड म्न्यूज आहे ऑफिसला पंधरा दिवसाची सुट्टी आहे (दादा एक गूम्ड न्यूज आहे), सरकार  हिमालयाच्या सावलीसारखे जनतेच्या पाठीशी आहे, ‘अ परफेक्ट मर्डर ’, दुर्लक्ष करू नका अनन्यसाधारण गोष्ट नाही ही (अनन्या), (व्हॅक्यूम क्लीनर)चा उपयोग करून घर स्वच्छ ठेऊ आणि करोनाला दूर घालवू , घरी बसून काय करायच हा प्रश्न असेल तर मुलांना  (कापूस कोंडय़ाची गोष्ट)सांगा, घरी थांबू महारथी बनू करोनाशी संघर्ष करू (महारथी), ‘थोड तुझ थोड माझ ऐकूया पण घरातच राहूया, घरी थांबून कुटुंबाची काळजी घेऊ आणि मगच तिसरे बादशाह होऊ (तीसरे बादशाह हम), ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला आता घरातच बांधू (हरवलेल्या पत्त्यांचा बंगला), करोना सुनसान रस्ते बघून म्हणत असेल (गुमनाम है कोई), थोडे दिवस ब्युटी पार्लर टाळल सौंदर्य कमी होईल पण तब्येतीच ऐ्श्वर्य वाढेल ( ऐश्वर्या एक ब्युटी पार्लर ) या  लोकप्रिय मराठी नाटकांचे शीर्षक गुंफून लिहीलेल्या संदेशांना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.  हे संदेश करण्याची कल्पना सुलेखनकार वैभव शेटकर यांची आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्व नागरिक घाबरले आहेत. नाटक प्रेक्षकांच्या विस्मृतीत जाऊ नये यासाठी ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली. यातून प्रेक्षकांना घरीच राहण्याचे आणि सुरक्षेची काळजी घेण्याचे संदेश देण्यात आले असल्याचे शेटकर यांनी सांगितले. यासह ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ आणि ‘इब्लिस’ या नाटकांचा उपयोग करण्यात आल्याचे अद्वैत थिएटर्सचे प्रमुख राहुल भंडारी यांनी सांगितले.  झी टॉकीजने सातच्या आत घरात, नेटसम्राट (अस वर्क फ्रॉम होणे नाही). आता सिंगल नाही डबल सीट, ती सध्या घरूनच मेल करते,  या अस्मानी संकटावर  फत्तेशिकस्त मिळवायचीय, टपरी वर नको आता घरीच ‘खारी बिस्कीट’ खा, आपली सिस्टीम भारी आपले डॉक्टर्स भारी आपल सगळच ‘लय भारी,’  ‘ती आणि तीं’ कीप सेफ डिस्टन्स, सध्या सगळे जगच ‘व्हेंटिलेटरं’वर आहे असे चित्रपटांची नावे संदेशरुपात देऊन केली आहे.

कलाकारांचेही सुरक्षेचे आवाहन

ज्येष्ठ कलांवत मंगला बनसोडे यांनी चित्रफीत तयार केली आहे.  दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घेऊन कलाकारांसोबत स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले आहे. अभिनेते प्रशांत दामले  आणि  लोकशाहीर आनंद शिंदे यांनी पोवाडय़ाद्वारे घरी राहण्याचे आवाहन  सांगितले आहे.