शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे दुसरे टि्वट केल्यानंतर मिया खलिफाने प्रियांका चोप्रावर निशाणा साधला आहे. ‘मिसेस जोनास’ शेतकरी आंदोलनाबद्दल तुम्ही गप्प का? असा सवाल मियाने विचारला आहे. मियाने तिच्या टि्वटमध्ये केलेला ‘मिसेस जोनास’ हा उल्लेख प्रियांका चोप्राबद्दल आहे. कारण प्रियांकाचे लग्नानंतरचे आडनाव जोनास आहे. प्रियांकाचे शेतकरी आंदोलनाबद्दलचे शेवटचे वक्तव्य डिसेंबर महिन्यात आले होते.
मागच्या आठवडयात मिया खलिफाने रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग पाठोपाठ शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टि्वट केल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. ‘आमच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नको’ अशा शब्दात तिला सुनावण्यात आलं. पण त्यानंतर मियाने काल पुन्हा एकदा समोसा, गुलाबजाम हे भारतीय पदार्थ खाऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.
‘मिसेस जोनास’ तुम्ही कधी बोलणार आहात? मला उत्सुक्ता लागून राहिलीय. बेरुत उद्धवस्त झालं, त्यावेळी शकीरा शांत होती, हे मला तसं वाटतय असे मियाने तिच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान प्रियांकाने डिसेंबर महिन्यात शेतकरी आंदोलनाबद्दल टि्वट केले होते.
Is Mrs. Jonas going to chime in at any point? I’m just curious. This is very much giving me shakira during the Beirut devastation vibes. Silence.
— Mia K. (@miakhalifa) February 7, 2021
प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे”. प्रियांका चोप्राचं हे ट्विट दिलजीतने रिट्विट केलं आहे.