News Flash

‘डोक्याला शॉट’मधून मिका सिंगचे मराठीत पदार्पण

मराठीमधील अनेक हिट गाण्यांना संगीत देणाऱ्या 'अमितराज' यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

गायक मिका सिंग (संग्रहित छायाचित्र)

‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या नावावरुनच या सिनेमात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की. विशेष म्हणजे या सिनेमाच्यानिमित्ताने बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंग मराठीत पदार्पण करणार आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आपला आवाज देणारा ‘ द मिका सिंग’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताला आवाज देणार आहे. तर मराठीमधील अनेक हिट गाण्यांना संगीत देणाऱ्या  ‘अमितराज’ यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केलं आहे.

उत्तुंग ठाकूर यांना या उडत्या चालीच्या गाण्याला जरा वेगळा आणि मराठीमध्ये आजवर कधीही न ऐकलेला असा आवाज हवा होता. म्हणून त्यांनी मिका सिंगचं नाव अमितराज यांना सुचवलं. त्यानंतर जास्त वेळ न दवडता अमितराज यांनी देखील या नावाला पसंती दर्शवली.

डोक्याला शॉटच्या निमित्याने ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 5:07 pm

Web Title: mika singh to make marathi debut with dokyala shot
Next Stories
1 ‘ठाकरे’साठी नवाजुद्दीन नव्हे तर या अभिनेत्याला होती पहिली पसंती
2 शिवानी बावकरचा ‘युथट्यूब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 Thackeray Box Office Collection : ‘ठाकरे’च्या पहिल्या दिवसाची कमाई माहित आहे का ?
Just Now!
X