टिव्ही मालिका ‘अ माउथ फुल ऑफ स्काई’ पासून ते २०१५ मध्ये रणवीर सिंगचा आलेला ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमापर्यंत अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मिलिंदने एका मुलाखतीत सांगितले की, चांगली शरीरयष्ठी बनवण्यासाठी त्यान कधीही जीमची पायरीही चढली नाही. असे असले तरी वयाच्या पन्नाशीमध्ये ही तो एखाद्या तरुणाला लाजवेल अशी शरीरयष्ठी त्याने आपल्या मेहनतीने कमावली आहे. मॅरेथॉन स्पर्धेत धावण्यापासून ते जगातली सगळ्यात खडतर शारिरीक स्पर्धा जिंकणारा मिलिंद सोमण आपल्या सगळ्यांसाठीच एक आदर्श आहे. २०१५ मध्ये ‘आयनमॅन’ स्पर्धा १५ तास १९ मिनिटात पूर्ण करुन या स्पर्धेचा विजेता बनला होता. ही एक ट्राइथेलॉन स्पर्धा असते ज्यात ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकल चालवणे आणि ४२.२ किलोमीटर न थांबता पळणे अशी ही खडतर स्पर्धा असते.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना ही स्पर्धा १७ तासात पूर्ण करणे आवश्यक असते. अनेकांना मिलिंदच्या नावावर ‘ग्रीनेथन’साठी ‘लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ही आहे याचीही कल्पना नाहीए. ३० दिवसाच्या आत १५०० किलोमीटर धावण्यासाठी त्याचे नाव लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. तो स्वतः पिंकथॉनचा सदिच्छा दूतही आहे. नुकतेच मिलिंदने अहमदाबाद ते मुंबई ५२७ किलोमीटर अनवाणी धावल्यानंतर आता त्याने आसाममध्ये १८० किलोमीटर सायकलही चालवली आणि तीही फक्त एका दिवसात.


गुवाहाटी ते नागाव सायकल चालवताना तो त्याची सायकल स्वारी चांगलीच एन्जॉय करताना दिसत आहे. तो किती एन्जॉय करतो आहे. पण तुम्हाला माहित आहे का वयाच्या ५० व्या वर्षीही एवढं तंदुरुस्त राहण्याची खरी किमया कोणाची आहे. ही किमया आहे मिलिंदच्या आईची. मिलिंदची आईही द ग्रेट इंडिया रनमध्ये मिलिंद बरोबर धावताना दिसली.