ऑल्ट बालाजी आणि जी५ वर प्रदर्शित होणाऱ्या ‘पौरषपूर’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच ही वेब सीरिज त्यातील बोल्ड दृश्यांमुळे जोरदार चर्चेत आहे. यामध्ये मिलिंद सोमण, अन्नू कपूर, शिल्पा शिंदे, शाहीर शेख, पौलमी दास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीपासून बोल्ड दृश्यांचा भरणा पाहायला मिळतो.

पुरुषांची मक्तेदारी, केवळ शारीरिक सुख देणारी वस्तू म्हणून स्त्रियांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन, स्त्रियांना मिळणारी तुच्छ वागणूक हा या सीरिजच्या कथेचा गाभा आहे. पुरुषप्रधान राज्यात एक स्त्री सत्तेची खुर्ची मिळवण्यात यशस्वी होते का, हे या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. या वेब सीरिजसाठी बराच खर्च करण्यात आला असून त्याचा सेट, कलाकारांचा पोशाख विशेष लक्ष वेधून घेतात.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

ही सीरिज येत्या २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्याचे सात ते आठ भाग असतील. या सीरिजच्या माध्यमातून शिल्पा शिंदे ओटीटी विश्वात पदार्पण करतेय. तर छोट्या पडद्यावरील शाहीर शेख याचीही सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे.