27 November 2020

News Flash

नोज रिंग आणि काजळ…न्यूड फोटोनंतर पुन्हा एकदा मिलिंद सोमण चर्चेत

मिलिंदचा हा कधीच न पाहिलेला लूक सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

मिलिंद सोमण

फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमण सतत काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. समुद्रकिनाऱ्यावरील न्यूड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून वादात अडकलेल्या मिलिंदने आता आणखी एक नवीन फोटो पोस्ट केला आहे. नोज रिंग आणि काजळ लावलेला मिलिंदचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

चेहऱ्यावर रंग, नोज रिंग, डोळ्यांत काजळ आणि भेदक नजर.. असा हा मिलिंदचा फोटो आहे. ‘मला माहितीये की आता होळी नाहीये पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईजवळ असलेल्या कर्जतमध्ये काही मजेशीर गोष्टी केल्या आहेत. लवकरच त्याबद्दल सांगेन’, असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. मिलिंदच्या आगामी प्रोजेक्टसाठीचं हे फोटोशूट असून त्याची घोषणा लवकरच होणार आहे. मात्र सध्या तरी मिलिंदचा हा कधीच न पाहिलेला लूक सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

आणखी वाचा : प्रेक्षकांची निराशा करणारी ‘लक्ष्मी’

मिलिंदने नुकताच त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवशीच त्याने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरील स्वत:चा न्यूड फोटो पोस्ट केला. या फोटोमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्याच्याविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 11:25 am

Web Title: milind soman sports a nose ring and kajal ssv 92
Next Stories
1 श्वेता तिवारी आणि अभिनव कोहलीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर, पतीने शेअर केला मुलाचा व्हिडीओ
2 Om Shanti Om : सेटवर पहिल्याच दिवशी शाहरुखला मागावी लागली जाहीर माफी, कारण…
3 Laxmii review : प्रेक्षकांची निराशा करणारी ‘लक्ष्मी’
Just Now!
X