21 January 2021

News Flash

‘तुमचे दात तुटल्यास मला दोष देऊ नका’; मिलिंद सोमणचा अतरंगी वर्कआऊट व्हिडीओ

‘मेड इन इंडिया’ अल्बमपासून ते ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ किताब पटकावणारा मिलिंद तरुणांसाठी आदर्शस्थानी आहे.

मिलिंद सोमण

‘आयर्न मॅन’, ‘फिटनेस फ्रीक’ अशा विविध नावांनी अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण ओळखला जातो. मिलिंदचं व्यायामासाठी, फिटनेससाठी असलेलं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. सोशल मीडियावर विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांनाही विविध ‘चॅलेंज’ देत असतो. त्याने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने केलेला अतरंगी व्यायाम पाहून तुमचेही डोळे चक्रावतील.

‘नवीन प्रकार शिकण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हालासुद्धा असं करायचं असेल तर काळजीपूर्वक करा. हे करताना तुमचे दात तुटल्यास मला दोषी ठरवू नका’, असं त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या व्हिडीओत मिलिंदने पुशअप्सला एक वेगळा टच दिलाय असं म्हणायला हरकत नाही. पुशअप करताना मिलिंदने त्याचं संपूर्ण शरीर हवेत झोकून दिलं आणि नंतर पुन्हा जमिनीवर दोन्ही हात आणि पाय टेकवले.

आणखी वाचा : ..तर ‘राजा हिंदुस्तानी’ ऐश्वर्याचा पहिला चित्रपट ठरला असता

मिलिंदच्या या व्हिडीओला भरभरून लाइक्स व कमेंट्स मिळत आहेत. सध्याच्या घडीला मिलिंद कोणत्याही चित्रपटामध्ये सक्रिय नसला तरीही सोशल मीडियावरच्या त्याच्या पोस्टमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. ‘मेड इन इंडिया’ अल्बमपासून ते ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ किताब पटकावणारा मिलिंद तरुणांसाठी आदर्शस्थानी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 5:41 pm

Web Title: milind soman unique push up video will make you surprise ssv 92
Next Stories
1 तारक मेहतामधील या कलाकाराला सुरुवातीला ३ रुपयांसाठी करावे लागत होते अनेक तास काम
2 दोन दशकांनंतर प्राण यांनी ‘जंजीर’मधील माझ्या कामाचं केलं कौतुक – अमिताभ बच्चन
3 जॅकलिन म्हणते लॉकडाउनच्या काळात समजतंय आयुष्य अगदीच…
Just Now!
X