‘फिटनेस फ्रिक’, ‘आयर्न मॅन’ अशा नावांनी ओळखला जाणारा अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण एकेकाळी सिगारेट्सच्या व्यसनाधीन होता. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत मिलिंदने सांगितलं होतं की, तो एका दिवसात ३० सिगारेट ओढायचा. सिगारेटचं व्यसन सोडणं किती कठीण असतं आणि हे व्यसन सोडण्यासाठी त्याला किती काळ लागला याबद्दल मिलिंदने मुलाखतीत सांगितलं. त्याचसोबत मिलिंदने त्याचा फिटनेस फंडासुद्धा चाहत्यांना सांगितला.

मिलिंदने तीन वर्षांत सिगारेटचं व्यसन पूर्णपणे सोडलं. यासोबतच त्याने स्वत:च्या खाण्यापिण्याचं, व्यायामाचं एक वेळापत्रक तयार केलं. मिलिंद आजही हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळतो.

मिलिंद सोमणचा फिटनेस फंडा

मिलिंदच्या दिवसाची सुरुवात बदाम खाऊन होते. “गेल्या अनेक वर्षांपासून मी नाश्ता करण्यापूर्वी बदाम खातोय. त्यामुळे संपूर्ण दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते. बदामात अनेक पोषकतत्त्व आहेत”, असं तो म्हणाला. मिलिंदने साखर अजिबात खात नाही. याविषयी तो पुढे म्हणाला, “मला गोड खाण्याची इच्छा झाली तर मी गुळ किंवा मधापासून तयार केलेले गोड पदार्थ खातो. प्रोसेस्ड किंवा ओव्हर प्रोसेस्ड पदार्थ मी कधीच खात नाही. मी बिस्कीटसुद्धा खात नाही.” मिलिंदच्या डाएटमध्ये भरपूर फळांचा समावेश असतो.

आणखी वाचा : नागा-चैतन्य व साई पल्लवीच्या ‘लव्ह-स्टोरी’वर समंथा नाराज?

मिलिंद सोमणचं फिटनेस रुटीन

फिटनेस रुटीनविषयी मिलिंदने सांगितलं, “मी दररोज धावण्याचा व्यायाम करत नाही. आठवड्यातील तीन-चार दिवस मी धावतो. त्याशिवाय कार्डिओ करतो. सायकलिंग करायला मला खूप आवडतं. सायकलिंगमुळे पायाचा व्यायाम होतो.