11 December 2018

News Flash

…अन् शाहिदच्या मुलीने आईला रंगवले

दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या मुलाच्या पार्टीत दिसले स्टार किड्स

बॉलिवूड दिग्दर्शक अभिषेक कपूरची मुलगी इशानाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या पार्टीला शाहिद कपूरची मुलगी मिशासह अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. पार्टीची थीम पांढरे कपडे होती. त्यामुळे आई- बाबांसह सगळीच मुलं पांढऱ्या कपड्यांमध्ये आलेली दिसली.

शाहिदची मुलगी मिशा तर रंगांसोबत खेळण्यात एवढी दंग होती की तिने स्वतःचे कपडे तर खराब केलेच शिवाय आपल्या आईलाही अनेक रंगांमध्ये रंगवले. मीराचे संपूर्ण कपडे आणि शरीर रंगांनीच माखले होते. अभिषेकच्या घरात जाताना मीराने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिमचा स्कर्ट घातला होता. पण तिथून निघताना मात्र ती पूर्ण बदललेली होती. मीराचे कपडेच नाही तर मीराचा फोनही रंगला होता. ती फोनवर बहुधा मिशाने केलेल्या मस्तीचा पाढा ऐकवत असेल.

फार लोकांना माहीत नसेल पण एकता कपूर आणि अभिषेक चुलत भावंडं आहेत. त्यामुळे अभिषेकच्या मुलीच्या वाढदिवसाला एकता तुषारचा मुलगा लक्ष्यला घेऊन पोहोचली होती. मिशा आणि मीरासोबत हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्यांची मुलं हृदय आणि हृहानही या पार्टीत आले होते. अभिनेता जॅकी भगनानीही त्याच्या भाच्याला आणि भाचीला घेऊन आला होता. त्यांनीही पांढऱ्या रंगाचेच कपडे घातले होते.

First Published on November 14, 2017 4:09 pm

Web Title: mira rajput misha kapoor abhishek kapoor son birthday pictures