‘मिर्झापूर २’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली असून सर्व ठिकाणी त्याचीच जोरदार चर्चा आहे. पहिल्या सिझनपासूनच या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची प्रचंड उत्सुकता होती. आता दुसरा सिझन प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी एका रात्रीतच त्याचे सर्व एपिसोड्स पाहिले. ट्विटरवर अनेकांनी त्यांना ही सीरिज कशी वाटली, त्याबद्दल लिहिलंय. नेटकऱ्यांच्या मते ही सीरिज कशी आहे, ते जाणून घेऊयात..

प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

पहिल्या सिझननंतर आता दुसऱ्या सिझनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दुसरा सिझन ‘सेक्रेड गेम्स २’सारखा निराश करणारा नाही असं काहींनी म्हटलंय. तर काहींना हा सिझन पहिल्या सिझनइतका आवडला नाही. काहींनी तर या सीरिजला दहा पैकी दहा गुण दिले आहेत.

आणखी वाचा- “जो आया है, वो जायेगा भी, बस्स …”; ‘मिर्झापूर 2’चे १२ भन्नाट डायलॉग

‘मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार आहे. उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले होते.