अॅमेझॉन प्राइमवरील अतिशय गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक असलेल्या ‘मिर्झापूर’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते आनंदी असल्याचे दिसत आहे. नुकताच ‘मिर्झापूर २’ सीरिजची एक झलक पाहायला मिळाली आहे.
‘मिर्झापूर’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मिर्झापूर २’चा पहिला प्रोमो शेअर केला आहे. मिर्झापूर २ लवकरच तुमच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी प्रोमोमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी मिर्झापूर २ ही सीरिज एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता सप्टेंबर महिन्यात ‘मिर्झापूर २’ प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
१६ नोव्हेंबर २०१८ रोजी मिर्झापूर या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागात अली फजलने गँगस्टर गुड्डू पंडितची भूमिका साकारली होती. उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे आता ‘मिर्झापूर २’साठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.
मिर्झापूर २ चे चित्रीकरण पूर्ण झाले असून एडिटिंगचे काम देखील पूर्ण झाले असल्याचे म्हटले जात आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, विक्रांत मेसी, श्वेता त्रिपाठी, अली फजल आणि इतर कालाकर दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 3:01 pm