News Flash

मुन्नाभैय्या शेतकऱ्याच्या रुपात; ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

पाहा, दिव्येंदूच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर

ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुफान गाजलेली वेब सीरिज म्हणजे ‘मिर्झापूर’. या सीरिजमधील गुड्डू भैय्या, मुन्ना भैय्या,कालीन भैय्या या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळे या भूमिका साकारणारे कलाकार आज चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. या सीरिजमध्ये मुन्नाभैय्या ही भूमिका साकारत अभिनेता दिव्येंदू शर्माने त्याच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. या सीरिजनंतर दिव्येंदू लवकरच ‘मेरे देश की धरती’ या चित्रपटात झळकणार आहे.

अलिकडेच ‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये दिव्येंदू झळकला असून त्याचा नवा अंदाज यात पाहायला मिळत आहे. मॉर्डन लूक आणि एका हातात कुदळ घेऊन तो शेतात उभा असल्याचं दिसून येत आहे.  त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

नोकरी करणारे दोन इंजिनिअर्स तरुण नोकरीसोबतच काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. यातच ते शेतात राबण्याचा आणि शेतकरी होण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्या या प्रवास त्यांना कोणते अडथळे येतात. कोणत्या गंमती घडतात ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

“मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱ्याच्या एका वेगळ्या भूमिकेत काम करू शकलो. आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेवू शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदलले जाऊ शकते त्यासाठी तरुण नेतृत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल”, असं दिव्येंदू म्हणाला.

वाचा : 26/11चे हीरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा ‘सलाम’, सिनेमाच्या रिलीज डेटची केली घोषणा

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती वैशाली सरवणकर करत असून दिग्दर्शन फराझ हैदरी करत आहेत. या चित्रपटात दिव्येंदूसोबत अनंत विधात,अनुप्रिया गोएंका ,ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर हे कलाकार झळकणार आहेत. तर, यापूर्वी दिव्येंदू ‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’, ‘मिर्झापुर’, ‘बिच्छू का खेल’ या चित्रपट, वेब सीरिजमध्ये झळकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 4:23 pm

Web Title: mirzapur fame divyendu sharma will be seen in mere desh ki dharti in the role of a farmer ssj 93
Next Stories
1 ‘आव्हानात्मक भूमिका साकारायला मला आवडतं’, तुझं माझं जमतंय मालिकेतील अभिनेत्याचा खुलासा
2 जुही चावलाचे आलिशान घर पाहिलेत का?
3 करोना काळात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मास्टर’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम
Just Now!
X