News Flash

सुशांतच्या आत्महत्येनंतर मिथुन चक्रवर्ती सुन्न; घेतला ‘हा’ निर्णय

मिथुन चक्रवर्ती यांनी कोणता निर्णय घेतला असेल?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला आदरांजली वाहिली आहे. तर काहींनी त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी एक निर्णय घेतला आहे.

वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या सुशांतच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण शोक व्यक्त करत आहेत. यामध्येच अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याच निर्णय घेतला आहे.

“देशावर ओढावलेलं करोनाचं संकट, त्यातच सुशांतचं निधन या सगळ्यामुळे त्यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्तीने दिली आहे. केवळ वाढदिवसच नाही, तर या वर्षात येणारे कोणतेही सण, उत्सव सेलिब्रेट न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून कलाविश्वात सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांच्या मते, कलाविश्वातील सुशांतसोबत काही अशा घटना घडल्या ज्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 2:25 pm

Web Title: mithun chakraborty cancel his birthday celebration over sushant singh rajput demise ssj 93
Next Stories
1 ‘करण जोहर कोण आहे? काय कचरा…’ सुशांतच्या आत्महत्येनंतर बबिता फोगट संतापली
2 “हा तर त्याचा अपमान”; सुशांतबद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या कलाकारांवर संतापला सैफ
3 ‘ती अजूनही धक्क्यात’; सुशांतच्या आत्महत्येनंतर सैफने सांगितली साराची अवस्था
Just Now!
X