बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानूसार सततच्या व्यग्र कारभारामुळे ते पाठिच्या दुखण्याने त्रस्त होते. यावर उपचार करण्यासाठी ते लॉस ऐन्जेलिसला गेले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २००९ मध्ये इमरान खानच्या ‘लक’ या सिनेमात एक स्टंट केला होता. हा स्टंट करताना त्यांना दुखापत झाली होती. त्यांना एका दृष्यामध्ये चॉपरवरुन उडी मारायची होती. पण चुकीच्या उडीमुळे ते सरळ खाली जमिनीवर पडले आणि त्यांना गंभीर पाठीची जखम झाली. जेव्हा पाठिचे दुखणे थांबले नाही तेव्हा त्यांनी अमेरिकेतल्या तज्त्रांचा सल्ला घेण्याचे ठरवले. मिथून यांचे व्यवस्थापक यांनी या बातमीला दुजारा दिला आहे. ‘गेल्या दोन आठवड्यांपासून ते लॉस ऐन्जेलिसमध्ये उपचार घेत आहे असेही ते म्हणले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी ते भारतात येणार नाहीत,’ असेही ते म्हणाले.

मिथुन हे ८० च्या दशकातले नावाजलेले अभिनेते होते. ‘डिस्को डांसर’, ‘मुझे इन्साफ चाहिए’, ‘घर एक मंदिर’ यांसारख्या अनेक हिट सिनेमातून त्यांनी काम केले आहे. ‘हवाईजादा’ या सिनेमानंतर मिथुन यांनी व्यावसायिक पातळीवर कोणताही सिनेमा केलेला नाही. त्यांचे पाठिचे दुखणे लवकर बरे व्हावे इच्छ आमच्याकडून सदिच्छा.

मिथुन चक्रवर्ती यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेमध्ये पाठवण्यात आले होते. पण दोन वर्षांच्या या कालावधीत ते फक्त तीनदा संसदेत गेले होते. मंगळवारी आजारपणामुळे त्यांच्याकडून संसदेतून सुट्टीसाठी परवानगी मागण्यात आली तेव्हा खासदारांनी त्यांच्या सुट्टीवर आक्षेप घेतला होता. मिथुन यांनी नंतर वैद्यकीय प्रमाणपत्रही दाखवले.