News Flash

माझा होशिल ना मालिकेत ‘जेडी’ची एण्ट्री!

हा प्रसिद्ध अभिनेता वठवणार पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका!

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझा होशिल ना.’ ही झी मराठी वाहिनीवरची मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. झी मराठी अवॉर्ड्समधे सर्वोत्कृष्ट मालिकेसह सर्वाधिक पुरस्कार पटकवलेल्या या मालिकेत आता ‘जे डी’ या नव्या पात्राचं आगमन होणार आहे.

आदित्य कश्यपच्या आई, वडीलांचा मारेकरी आणि आदित्यचा सख्खा काका जयवंत देसाई उर्फ ‘जे डी’ हा आता अनेक वर्षांनी मुंबईच परतणार आहे. आदित्य ग्रुपची मालकी मिळवणं आणि ज्या ब्रह्मेंमुळे संपत्ती आणि कंपनीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता त्या ब्रह्मे भावांना देशोधडीला लावणं ही उद्दिष्टं डोक्यात ठेवून हा कपटी,बेरकी आणि क्रूर जेडी संकट बनून येणार आहे.

मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातला एक मोठा कलाकार ही भूमिका साकारत आहे. बहुढंगी भूमिका वठवणारे अभिनेते अतुल परचुरे पहिल्यांदाच खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. जेडीच्या आगमनाने आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होणार असून ब्रह्मे कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे. अनेक वेगवान घडामोडी घडताना दिसणार आहेत. आता आदित्यचे मामा आणि सई-आदित्य या नव्या आव्हानाला संकटाला कसे सामोरे जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 3:03 pm

Web Title: mjha hoshil na serial update avb 95
Next Stories
1 देशप्रेमाने भारलेला नवा चित्रपट…विकी कौशल नव्या रुपात!
2 देशप्रेमाने भारलेला नवा चित्रपट…विकी कौशल नव्या रुपात!
3 ‘काही दिग्दर्शकांनी माझ्यासोबत…’, सलमानवर आरोप करणाऱ्या सोमी अलीचा आणखी एक खुलासा
Just Now!
X