गेल्या दीड वर्षापासून देशभरात करोनाचे संकट आपला पाठलाग सोडत नाही आहे. याचा परिणाम हा सण आणि उत्सवांवर दिसत आहे. गेल्या वर्षी तर जवळपास सगळेच उत्सव हे एकतर रद्द करण्यात आले किंवा मग कमी लोकांच्या उपस्थितीत आपल्याला सण साजरा करावा लागला. यासगळ्यात यंदा करोना लसीकरण सुरु झाल्यानंतर आता मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर अभिनेता प्रविण तरडेने यावर कमेंट केली आहे.

मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून हे जाहीर केलं आहे. अभिजित यांनी ही पोस्ट फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली आहे. “विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार”, असं म्हटलं आहे. यावर आता प्रविण तरडेने “१०० टक्के नाचायला येणार” कमेंट केली आहे. ही कमेंट पाहताच त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. प्रविण तरडेने मनसेच्या दहीहंडिला पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

pravin tarde, mns
मनसेच्या दही हंडिला प्रविण तरडेचा पाठिंबा

आणखी वाचा : गर्भवती असल्याच्या चर्चांवर सोनम कपूरने सोडलं मौन

करोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंध लागू असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना यंदा राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याविषयी संभ्र असताना राज्य सरकारने काही जाहीर करण्याआधीच मनसेनं विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.