15 January 2021

News Flash

‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का?’; ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला

‘लव्ह जिहाद’ विरुद्ध मध्यप्रदेशात येणार कडक कायदा

मध्यप्रदेश सरकार आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, आम्ही विधानसभेत लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहोत. हा एक अजामीनपात्र गुन्हा असेल आणि दोषींना पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेल. मध्यप्रदेश सरकारच्या या निर्णयावर अभिनेता जिशान अय्युब संतापला आहे. आता धर्म पाहून प्रेम करायचं का? असा सवाल त्याने सरकारला केला आहे.

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकाराची टीका

“प्रेम केल्यावर तुरुंगात जावं लागेल की प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहावा लागेल? घाबरु नका समाजात द्वेष पसरवणाऱ्याना आता कोणी टोकणार नाही. उलट टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं जाईल. लव्ह जिहादसारख्या एका खोट्या संकल्पनेवर कायदा तयार केला जात आहे. वाह सरकार कमाल केलीत तुम्ही.” अशा आशयाचं ट्विट करुन जिशानने आपला राग व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – VIDEO: कर्करोगग्रस्त अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; चाहत्यांकडे मागितली आर्थिक मदत

अवश्य पाहा – पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची हत्या

या अगोदर उत्तर प्रदेश, हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले की, “आगामी विधानसभा सत्रात शिवराजसिंह सरकारकडून लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर धर्म स्वातंत्र्य कायद्यासाठी विधेयक सादर केले जाईल आणि कायदा तयार झाल्यानंतर अजामीनपात्र कलमांतर्गत खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा दिली जाईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 1:42 pm

Web Title: mohammed zeeshan ayyub love jihad in madhya pradesh mppg 94
Next Stories
1 अर्जुन कपूरने शेअर केला मलायकाचा ‘हा’ खास फोटो; म्हणाला…
2 हेल्मेट न घातल्यामुळे तापसीला भरावा लागला दंड
3 Video : टॉम अँड जेरीचं दमदार पुनरागमन; ट्रेलर पाहून आठवेल बालपण
Just Now!
X