News Flash

मोहनलाल यांनी वाढदिवशी प्रेक्षकांना दिली भेट, ‘दृश्यम २’चा टीझर प्रदर्शित!

पाहा टीझर...

मल्याळय चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार मोहनलाल यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. पण सध्या लॉकडाउनमुळे ते त्यांचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करत आहेत. तसेच या खास दिवशी त्यांनी चाहत्यांना एक भेट दिली आहे. त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘दृश्यम २’चा टीझर प्रदर्शित केला आहे.

‘दृश्यम २’ या चित्रपटाची निर्मिती एंटनी पेरुमबवूर यांनी केली असून दिग्दर्शन जेथु जोसफ करत आहेत. या २० सेकंदाच्या टीझरमध्ये मोहनलाल हळूहळू त्यांचे डोळे उघडताना दिसत आहेत. तेसच हा टीझर शेअर करत त्यांनी ‘दृश्यम.. दृश्यम २’ असे हॅशटॅग वापरत म्हटले आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या चित्रपटात मोहनलाल हे जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारणार आहेत. तसेच ‘दृश्यम २’ चित्रपटाची संपूर्ण कथा ही जोर्गेकुटी आणि त्यांच्या कुटुंबीयांभोवती फिरताना दिसणार आहे. चित्रपटात जोर्गेकुटी हे आपल्या मुलीने केलेल्या खुनाचे रहस्य लपवताना दिसणार आहेत. चित्रपटात जोर्गेकुटी यांच्या व्यतिरिक्त कोणते कलाकार दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही. लवकरच या कलाकारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

मोहनलाला आणि जेथु जोसफ काही दिवासांपूर्वी मल्याळम थ्रिलर चित्रपट ‘राम’साठी एकत्र काम करत होते. या चित्रपटात तृषा कृष्णन मुख्य भूमिकेत आहे. डिसेंबर २०१९मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. पण लॉकडाउनमुळे य़ा चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 1:42 pm

Web Title: mohanlal official announces next drishyam 2 on his birthday avb 95
Next Stories
1 Video : स्थलांतरित मजुरांचं जगणं मांडणारा ‘कच्चे दिन’ प्रदर्शित
2 कपिल शर्माने ट्विटरद्वारे कायस्थ समाजाची मागितली माफी
3 बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोघांना करोनाची लागण
Just Now!
X