सलमान खानच्या ‘दबंग -३’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला होता. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली तर काही जणांनी खिल्ली देखील उडवली. परिणामी ‘दबंग ३’ मुळे झालेला अपेक्षाभंग दूर करण्यासाठी सलमान आता ‘राधे’ हा नवा अॅक्शनपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.
अवश्य वाचा – हे कलाकार साकारणार ’83’ च्या विजयाचे शिल्पकार
अवश्य वाचा – प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.. पाहा भारत वि. जपान सामन्याची चित्रमय झलक
‘मोस्ट वाँटेड भाई राधे’ या पोस्टरमध्ये अॅक्शन अंदाजात दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करत आहे. तर निर्मितीची जबाबदारी सलमानचा भाऊ सोहेल खान याने स्विकारली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकाबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप जाहिर केलेली नाही. परंतु ‘राधे’ हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाँटेड’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात सलमानने राधे ही व्यक्तिरेखा साकारली होती. यावरुनच या आगामी चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे म्हटले जात आहे.