26 May 2020

News Flash

‘जेव्हा आग आणि पाणी एकत्र येते’; अजय देवगणने पोस्ट केला RRRचा मोशन पोस्टर

तान्हाजीनंतर येतोय आता अॅक्शनचा धमाका RRR

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर आता अजय देवगण आणखी एक नवा अॅक्शनपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘आर आर आर’ असं आहे. अजय देवगणने चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत या चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

“सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जेव्हा आग आणि पाणी यांसारख्या दोन परस्पर विरुद्ध शक्ती एकत्र येतात. तेव्हा एका नव्या उर्जेचा जन्म होतो.” असं म्हणत अजयने हा पोस्टर शेअर केला आहे. या एक मिनिटाच्या मोशन पोस्टरमध्ये आग आणि पाण्यातून एकमेकांच्या दिशेने धावत येणारी दोन माणसं दिसत आहेत.

या चित्रपटाचं नाव ‘आर आर आर’ असं आहे. चित्रपटाच्या नावाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात अजय व्यतिरिक्त दाक्षिणात्य सुपरस्टार एन टी रामा राव आणि राम चरण देखील झळकणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची दबाबदारी बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी स्विकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 4:49 pm

Web Title: motion poster of ss rajamoulis roudram ranam rudhiram released mppg 94
Next Stories
1 VIDEO : सोशल मीडियावर उर्वशीच्या हॉट व्हिडीओचीच चर्चा
2 ‘दारु का कोटा फुल है ना’, असे विचारणाऱ्याला ऋषि कपूरचे भन्नाट उत्तर
3 श्रद्धा कपूरनं दिल्या अस्सल मराठीतून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
Just Now!
X