News Flash

…आमिर तरीही तू हॉट दिसतोस – सनी लिओनी

मिस्टर परफेक्शनिस्टच्या नव्या अवतारावर एक व्यक्ती भलतीच फिदा आहे आणि तिचं नाव आहे सनी लिओनी.

'स्नॅपडील'ची नवी जाहिरात पाहून सनी लिओनीने चक्क आमिर खानला 'तू जाडा दिसत असलास तरीही हॉटच दिसतोस', असे टि्वट केले आहे.

‘स्नॅपडील’ या ई-कॉमर्स संकेतस्थळाच्या जाहिरातीमध्ये शायरी सादर करत स्वत:ला जाडा म्हणणा-या, पोट सुटलेल्या आमिर खानचा नवा अवतार कदाचित त्याच्या सर्व चाहत्यांना रूचला नसेल. पण मिस्टर परफेक्शनिस्टच्या या अवतारावर एक व्यक्ती मात्र भलतीच फिदा आहे आणि तिचं नाव आहे पॉर्नपरी सनी लिओनी. ‘स्नॅपडील’ची नवी जाहिरात पाहून सनी लिओनीने चक्क आमिर खानला ‘तू जाडा दिसत असलास तरीही हॉटच दिसतोस’, असे टि्वट केले आहे. एवढंच नव्हे तर आमिर खाननेही ‘सनी तू खूप प्रेमळ आहेस, लव्ह यू’, असे म्हणत तिच्या टि्वटला उत्तरही दिले आहे.


आमिर खानची स्नॅपडीलची नवी जाहिरात येथे पाहा

मी येथे खानमंडळींसोबत स्पर्धा करण्यासाठी आलेली नाही आणि संधी मिळाली तर मला त्यांच्यासोबत काम करायला जरूर आवडेल, असं सनी लिओनी अलिकडेच म्हणाली होती. मला सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खानसोबत काम करायला आवडेल, ते मेगास्टार आहेत असं सनी म्हणाली होती. मी शाहरूखला भेटले आहे आणि तो अतिशय चांगला माणूस आहे. आमिर खान माझ्या बकेट लिस्टमध्ये (प्रतिक्षा यादीत) आहे आणि जर मला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मी जरूर करेन असंही सनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2015 1:57 pm

Web Title: motte or not you still look hot sunny leone to aamir khan
टॅग : Sunny Leone
Next Stories
1 ‘कोर्ट’ ऑस्करच्या पहिल्या पायरीवर!
2 ‘मामि’साठी दिग्दर्शक मोटवानेंचे खास अभियान
3 ‘पारंपारिक लवंग लतिकेचा बाप्पाला नैवेद्य’
Just Now!
X