टेलिव्हिजन सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ग्लॅमरस अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय लवकरत लग्नबंधनात अडकरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मौनी तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मौनी लवकरत बॉयफ्रेण्ड सूरज नंबियार याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

मौनी रॉयने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. सूरुज आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो तिने पोस्ट केले होते. एवढचं नाही तर सुरजच्या आई वडिलांसाठी मौनीने या फोटोत ‘मॉम आणि डॅ़ड’ असं लिहलं होतं.

अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी मौनीचं कुटुंब आणि सूरजच्या कुटुंबामध्ये लग्नाची बोलणी झाल्याचं कळतंय. मंदिरा ही मौनीची जवळची मैत्रिण आहे. यावेळी मंदिराचा भाऊदेखील उपस्थित होता. यावेळी दोघांच्या लग्नाची तारीख ठरवण्यात आल्याचं कळतंय.

गेल्या काही दिवसांपासून मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत. सूरज दुबईमध्ये बॅकिंग क्षेत्रात कार्यरत आहे.  मौनीने सुरुजच्या कुटुंबासोबत दुबईमध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केल्याचंही समोर आलं होतं. लॉकडाउनच्या काळातही मौनी तिच्या बहिणीकडे तिच्या कुटुंबासोबत दुबईमध्येच होती. या काळातले अनेक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. याच काळात दोघांची भेट झाली. दोघांकडूनही अद्याप लग्नाची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या आधी मौनी मोहित रैनासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र काही कारणास्तव दोघांचं ब्रेकअप झालं.

एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून मौनीने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक मालिकांमधून झळकली. मात्र ‘देवो के देव महादेव’ या मालिकेतील तिची पार्वतीची भूमिका प्रेक्षकांना सर्वाधिक पसंत आली. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘केजीएफ’ या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मौनीचं आयटम साँग चांगलच गाजलं. लवकच मौनी ब्रह्मास्त्र सिनेमात एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.