News Flash

मनोज वाजपेयी साकारणार कुख्यात गुंड विकास दुबे? तो म्हणतो…

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी चकमकीत ठार केलं होतं.

विकास दुबे, मनोज वाजपेयी

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी चकमकीत ठार केलं. विकास दुबे याने गेल्या कित्येक वर्षांपासून आपली दहशत कायम ठेवली होती. त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयी विकासची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता मनोज वाजपेयीने मौन सोडलं आहे.

विकास दुबेच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात मनोज वाजपेयी मुख्य भूमिका साकारू शकतात असं एका नेटकऱ्याने ट्विट केलं. त्याचसोबत त्याने वृत्तपत्राचा फोटो पोस्ट केला. या ट्विटला उत्तर देत मनोज वाजपेयीने लिहिलं, ‘हे खरं नाही.’

कोण होता विकास दुबे?

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची सत्ता होती, त्यावेळी विकास दुबेचा बराच दबदबा होता. त्या काळात विकास दुबेनं गुन्हेगारी जगतात जम बसवला. विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात ६० गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांमध्ये खंडणी, अपहरण, हत्येचे गुन्हे दाखल होते. विकास दुबे याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचाही आरोप होता. याच विकास दुबेला २ जुलै रोजी पोलीस अटक करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. अखेर पोलिसांनी कारवाई करत विकास दुबेला चकमकीत ठार केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:21 pm

Web Title: movie on gangster vikas dubey here is what manoj bajpayee says ssv 92
Next Stories
1 Sushant Suicide Case: खरंच रिया चक्रवर्ती फरार आहे का? पाटणा पोलीस म्हणाले…
2 ‘तारक मेहता…’मधल्या सोधीने सोडली मालिका, शाहरुखच्या को-स्टारला रोलची ऑफर?
3 सुशांत आत्महत्या प्रकरण: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ मागणी पुन्हा फेटाळली, म्हणाले…
Just Now!
X