25 February 2021

News Flash

‘बिग बींमुळे सुटणार होता प्रश्न, पण..’ ; पत्नीची पोस्टिंग होऊनही परिहार दाम्पत्यांपुढे नवा प्रश्न

वाचा नेमकं काय आहे प्रकरण

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झालेले वाहतूक पोलीस काँस्टेबल विवेक परिहार सध्या चर्चेत आहेत. आपलं कर्तव्य बजावत असलेल्या विवेक परिहार यांना त्यांच्या पत्नीपासून दूर रहावं लागत आहे. त्यामुळेच ‘केबीसी’च्या सेटवर बिग बींनी जाहीरपणे या पोलीस जोडप्याचा विरह कमी करावा अशी विनंती केली होती. विशेष म्हणजे बिग बींच्या विनंतीनंतर या जोडप्याला दिलासादेखील मिळणार होता. मात्र, यात आता एक नवा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

विवेक परिहार आणि त्यांची पत्नी मध्य प्रदेशमध्ये पोलीस खात्यात आहेत. यात विवेक परिहार हे मंदसौरमध्ये आहेत. तर त्यांच्या पत्नीची पोस्टिंग ग्वाल्हेरमध्ये आहे. त्यामुळेच या दोघांचा विरह कमी व्हावा यासाठी बिग बींनी जाहीरपणे विनंती केली होती. त्यानुसार, १८ जानेवारीला पोलीस हेडक्वार्टर्समधून परिहार दाम्पत्याच्या बदलीचे आदेश निघाले. मंदसौरमध्ये नार्कोटिक्स विभागात प्रिती परिहार यांची तीन वर्षांसाठी बदली करण्यात आली. मात्र, आता या दाम्पत्यापुढे नवा प्रश्न निर्माण झाला आहे.


बदलीच्या आदेशानुसार, प्रिती यांची बदली मंदसौरमध्ये करण्यात आली. मात्र आता प्रिती मंदसौरमध्ये गेल्यामुळे विवेक यांचे वृद्ध आई-वडील ग्वाल्हेरमध्ये एकटेच पडले आहेत. त्यांची काळजी घेणारं किंवा त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणीही त्यांच्या जवळ नाही. त्यामुळे प्रितीच्या बदलीनंतर माझ्या आई-वडिलांची काळजी कोण घेणार?हा नवा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

आणखी वाचा- KBC: बिग बींच्या “त्या” विनंतीमुळे पोलीस कॉन्स्टेबल पती-पत्नी आले एकत्र

काय आहे प्रकरण
विवेक परिहार आणि त्यांची पत्नी मध्य प्रदेशमध्ये पोलीस खात्यात आहेत. यात विवेक परिहार हे मंदसौरमध्ये आहेत. तर त्यांच्या पत्नीची पोस्टिंग ग्वाल्हेरमध्ये आहे. प्रिती परिहार या इंदरगंज पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे विवेक हे मंदसौरमध्ये एकटेच राहतात. त्यामुळे या दोघांमधील विरह दूर व्हावा अशी विनंती बिग बींनी केली होती. बिग बींनी केलेली विनंती मंदसौरचे भाजपा आमदार यशपाल सिसोदिया यांच्यापर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे त्यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि डीजीपी यांच्याकडे विनंती करत या जोडप्याची समस्या दूर करण्याची विनंती केली होती.

बिग बींनी केलं होतं ‘हे’ आवाहन

केबीसीच्या मंचावर परिहार यांची त्यांची समस्या मांडली होती. त्यानंतर मध्य प्रदेशात वाहतूक पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न जो कोणी हाताळत असेल, त्यांनी परिहार दाम्पत्याची पोस्टिंग एकाच शहरात होईल, याची काळजी घ्यावी. कृपया त्यांचा विरह दूर करा. तुम्हाला त्यामुळे कोणताही फटका बसणार नाही, असं बिग बी म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 11:17 am

Web Title: mp government transfers constable wife after amitabh bachchan appeals from the set of kbc know why vivek parmar is unhappy ssj 93
Next Stories
1 कमल हासन रुग्णालयात दाखल; पायावर होणार शस्त्रक्रिया
2 दोनाचे चार हात! मानसी नाईक अखेर विवाहबद्ध
3 ६० देशांतील १२६ चित्रपटांची मेजवानी 
Just Now!
X