‘मिस्टर इंडिया’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या सायंन्स फिक्शन चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केली होती. या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर एक ब्रेसलेट घालून गायब होतात. अशीच गायब होण्याची शक्ती एका लहान मुलीने शेखर कपूर यांच्याकडे मागितली आहे. तिला ‘मिस्टर इंडिया’ बनून चीनशी लढायचं आहे. तिच्या या चकित करणाऱ्या मागणीवर शेखर कपूर यांनी देखील तितकेच मजेशीर उत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

चमन वार्ष्णेय नावाच्या एका व्यक्तीने आपल्या लहान मुलीची मागणी ट्विटरद्वारे शेखर कपूर यांना सांगितली. “माझ्या मुलीला मिस्टर इंडिया हा चित्रपट खूप आवडतो. मिस्टर इंडिया बनून तिला चीनशी लढायचं आहे.” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. या ट्विटवर शेखर कपूर यांनी देखील गंमतीशीर उत्तर दिले. “जेव्हा तुमची मुलगी मोठी होईल तेव्हा मी तिला मिस्टर इंडियाचं अदृश्य होण्याचं रहस्य पाठवेन.” असं ट्विट त्यांनी केलं आहे. शेखर कपूर यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – “केलेल्या पापांची याच जन्मात फळं भोगावी लागतील”; अभिनेत्याने केली सलमानवर टीका

‘मिस्टर इंडिया’ बॉलिवूडमधील मोजका सायंन्स फिक्शन चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झाला होता. परंतु आज २३ वर्षानंतरही हा चित्रपट तितकाच लोकप्रिय आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि श्री देवी यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.