News Flash

‘एका पर्वाचा अंत झाला’; धोनीच्या निवृत्तीवर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

बॉलिवूड सेलिब्रिटींनी शेअर केली भावनिक पोस्ट

टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एम.एस. धोनीने शनिवार (१५ ऑगस्ट) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. त्यातच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनीप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त केलं आहे. यात काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी भावनिक पोस्टही शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकटेमधून निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली होती. अखेर त्याने १५ ऑगस्टच्या दिवशी अचानकपणे निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनंतर अनेकांना धक्का बसला असून तुला विसरता येणं शक्य नसल्याचं चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी म्हटलं आहे.

‘गर्वाने सर्वांची मान उंचावल्यामुळे मनापासून धन्यवाद माही’, असं अभिनेता रणवीर सिंह म्हणाला आहे. तर, ‘एका पर्वाचा अंत झाला. सगळ्या आठवणींसाठी मनापासून धन्यवाद’, असं अभिषेक बच्चन म्हणाला आहे.

‘प्रत्येक क्षणासाठी धन्यवाद’, असं अभिनेता विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं होतं. तसंच ‘तू आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाहीस’, असं रितेश देशमुख म्हणाला आहे.

रितेश, रणवीर सिंग, विकी कौशलप्रमाणेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान,आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 12:04 pm

Web Title: ms dhoni retires taapsee pannu randeep hooda say a chapter ends in indian cricket ssj 93
Next Stories
1 …म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्याने जावेद अख्तर ट्रोल
2 ‘आमच्या हृदयात तुझ्यासाठी खास जागा आहे’; धोनीच्या निवृत्तीवर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया
3 धोनीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पोस्ट, म्हणाली…
Just Now!
X