News Flash

एकीकडे मुकेश खन्नांच्या निधनाची अफवा, तर दुसरीकडे बहिणीचा मृत्यू!

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कलाकारांच्या निधनाच्या अफवा सुरु असल्याचे पाहायला मिळते. गायक लकी अली यांच्या पाठोपाठ अभिनेते मुकेश खन्ना यांचे निधन झाल्याचे म्हटले जात होते. पण स्वत: मुकेश खन्ना यांनी व्हिडीओ शेअर करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. हे सर्व सुरु असतानाच मुकेश खन्ना यांच्या बहिणीचे निधन झाले आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

मुकेश खन्ना यांनी बहिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी बहिणीच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘काल कित्येक तास मी माझ्या निधनाच्या अफवा खोट्या असल्याचे सांगण्यासाठी संघर्ष करत होतो. पण तेव्हा मला कल्पनाही नव्हती की एक भंयकर सत्या माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे. आज माझ्या एकुलत्या एक बहिणीचे दिल्लीमध्ये निधन झाले. तिच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. १२ दिवसांमध्ये करोनावर मात केल्यानंतर तिचे निधन झाले आहे’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : ‘मोदीजी पुढचे आणखी १० वर्ष पंतप्रधान रहावेत, कारण मला भक्तांना…’, अभिनेत्याचं देवाला साकडे

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

मुकेश खन्ना यांनी स्वत:च्या निधनाच्या अफवा खोट्या असल्याचे सांगत व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते ‘मी एकदम ठिक आहे. माझ्या निधनाच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत’ असे बोलताना दिसत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 3:23 pm

Web Title: mukesh khanna lost her sister delhi emotional post viral on social media avb 95
Next Stories
1 ईद निमित्तानं सलमानचं चाहत्यांना आवाहन; “घराबाहेर जमा होऊ नका, मी भेटायला येऊ शकणार नाही…”
2 Video: पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिरने स्वत: रिक्षावर चिटकवले होते पोस्टर
3 Haryanvi Song: विश्वजीत चौधरींचा ‘कर्फ्यू’ होतोय व्हायरल; व्हिडीओमध्ये दिसला त्यांचा स्टायलिश अंदाज
Just Now!
X