News Flash

‘या’ कारणामुळे शक्तिमानमधील गीताला आले होते बदलण्यात, १५ वर्षांनंतर मुकेश खन्नांनी केला खुलासा

सुरुवातीला गीत विश्वास ही भूमिका किटू गिडवानीलाने साकारली होती.

नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान.’ त्यावेळी शक्तिमान या पहिल्या इंडियन सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर जादू केली होती. अनेक लहान मुलांनी तर शक्तिमान प्रमाणे उडण्याचा देखील प्रयत्न केला होता. या मालिकेने ८ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण या मालिकेत गीता विश्वास हे पात्र सकारणाऱ्या अभिनेत्रीला, किटू गिडवानीला शोमधून का काढण्यात आले हा प्रश्न आजही अनेकांना पडला आहे.

जवळपास १५ वर्षांनंतर आता शक्तिमान उर्फे मुकेश खन्ना यांनी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी गीता विश्वास या पात्राविषयी वक्तव्य केले आहे. ‘माझे शक्तिमानचे मित्र बऱ्याच वेळा विचारतात की मालिकेतील गीता विश्वासला का बदलले होते? गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही त्या मागचे कारण कोणाला सांगितले नव्हते. पण आता योग्य वेळ आली आहे. शक्तिमान मालिकेत अभिनेत्री किटू गिडवानीला बदलून गीता विश्वास या भूमिकेसाठी अभिनेत्री वैष्णवीची निवड करण्यात आली होती’ असे मुकेश खन्ना म्हणाले.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले, सुरुवातीचे एपिसोडमध्ये तिने चांगले परफॉर्म केले. पण दिवस अचानक ती दिग्दर्शकाकडे गेली आणि म्हणाली, माझी खूप धावपळ होत आहे. त्यानंतर मी दिग्दर्शकांना म्हणालो की तुम्ही तिला सांगा जर ती मालिका करत आहे आणि ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे तर धावपळ होणारच. या सर्व गोष्टींचा विचार मालिका साइन करण्यापूर्वी करायाला हवा होता. त्या वेळी तिच्याकडे काही फ्रेंच चित्रपटांच्या देखील ऑफर होत्या. त्यामुळे आम्ही गीता विश्वासला बदलून वैष्णवीला तो रोल दिला.

शक्तिमान या मालिकेत गीत विश्वास ही एक पत्रकार दाखवण्यात आली होती आणि तिनेच शक्तिमानला सर्वांसमोर आणले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 4:40 pm

Web Title: mukesh khanna reveals why geeta vishwas changed in shaktimaan avb 95
Next Stories
1 डॉक्टर डॉन मालिकेत सागर कारंडेची एण्ट्री
2 एजाज-पवित्रा बिग बॉसमुळे आले एकत्र, सीझन संपायच्या आत सुरु झाली लग्नाची तयारी?
3 टायगर श्रॉफच्या बहिणीने वाढदिवशी शेअर केला बिकिनी फोटो, आई म्हणाली..
Just Now!
X