News Flash

योगेश सोमण यांना ‘मुक्ता’चा पाठिंबा

सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई करण्यात आली.

योगेश सोमण

मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यावर आता रोज नवनव्या वादांना तोंड फुटत आहे. सोमण यांना आता मुक्ता शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला आहे. कुलगुरूंनी झुंडशाहीला बळी पडू नये असे पत्र संघटनेने दिले आहे.

योगेश सोमण यांनी राहुल गांधी यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मत नोंदवले होते. त्यानंतर एनएसयूआय या संघटनेने सोमण यांना हटवण्याची मागणी सुरू केली. नाटय़शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनीही विभागात पुरेशा सुविधा नसल्याचा आक्षेप घेत आंदोलन सुरू केले. छात्रभारती या संघटनेनेही आंदोलनात उडी घेतली.

अखेर विद्यापीठाने १३ जानेवारी रोजी सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली. मात्र, त्यानंतर सोमण यांना भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. कारवाई मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदनेही (अभाविप) केली. आता शिक्षक संघटनाही या वादात उतरल्या आहेत. मुक्ता या संघटनेने सोमण यांना पाठिंबा दिला आहे.

सोमण यांनी संचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून विभाग सक्षम झाला. मात्र त्यांची बाजू ऐकून न घेता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. झुंडशाहीला बळी पडून कारवाई करण्यात येऊ नये. विभागाच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, असे पत्र ‘मुक्ता’ने कुलगुरूंना दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 9:54 am

Web Title: mukta teachers union supports yogesh soman jud 87
Next Stories
1 “तिचं पोट बघा,” म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अनुष्का शर्माचे जबरदस्त उत्तर; म्हणाली….
2 ‘टिक टॉक’च्या व्हिडीओवरून कंगनाने घेतला दीपिकाशी पंगा, म्हणाली…
3 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसोबत पाहणार ‘तान्हाजी’
Just Now!
X