01 October 2020

News Flash

देवा, पावसाच्या तडाख्यापासून मुंबईला वाचव; कलाकारांचं गणरायाला साकडं

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत.

मंगळवार सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

मंगळवार सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर असाच कायम राहिल असा अंदाजही कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या प्रत्येकाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत घरीच राहण्यास प्राधान्य दिलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही पावसाचा तडाखा पाहता चाहत्यांना काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.

परिणीती चोप्रा, दिया मिर्झा, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा या कलाकारांनी ट्विट करत सद्यपरिस्थीतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. सर्वांनी कृपया काळजी घ्या, असं ट्विट करत परिणीतीने ट्विट केलंय. तर, नीतू कपूर यांनीही एक व्हिडिओ पोस्ट करत गणरायाला साकडं घातलं आहे. ऐन गणेशोत्सवादरम्यानच पावसाचा तडाखा वाढल्यामुळे सध्या रंगाचा बेरंग झाल्याचं वातावरण पाहायला मिळतय. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईकरांनो, पावसात अडकला आहात? ‘या’ अपडेट नक्की वाचा

पावसामुळे मुंबईत दादर, माटुंगा, वांद्रे या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूकही खोळंबली आहे. लोकल सेवा आणि रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे दुहेरी कात्रीत सापडलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 5:18 pm

Web Title: mumbai rains celebrities parineeti chopra deepika padukone anil kapoor ask fans to stay at home and be safe see photos videos
Next Stories
1 VIDEO: मतदार राजाला जागं करतोय ‘न्यूटन’चा हा सिद्धांत
2 अखेर ‘ते’ वृत्त समोर आलं
3 ‘केबीसी’मध्ये ‘लॉक किया जाए’ या वाक्याचा शोध लावणारा ‘हा’ अवलिया माहितीये का?
Just Now!
X