07 March 2021

News Flash

‘मर्डर-२’मधील अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, पती आहे कॉमेडियन

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळते. आदित्य नारायण, नेहा कक्कर, शाहीर शेख यांच्यापाठोपाठ आता ‘मर्डर २’ या हिंदी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रहीने लग्न केल्याचे समोर आले आहे. सुलग्नाने अतिशय लोकप्रिय विनोदी कलाकारक बिस्वा कल्याण रथशी लग्न केले आहे.

नुकताच सुलग्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. लग्नातील फोटो शेअर करत सुलग्नाने मजेशीर कॅप्शनही दिले आहे. ‘आम्ही लग्न केले आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sulagna Panigrahi (@sulagna03)

सुलग्नाने ‘मर्डर २’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. त्याचबरोबर तिने अनेक मालिकांमध्ये ही काम केले आहे. सुलग्ना हिने इश्क वाला लव्ह या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 4:21 pm

Web Title: murder 2 actress sulagna panigrahi gets married avb 95
Next Stories
1 कपिल शर्माची ऑफस्क्रीन मस्ती पाहिलीत का? पाहा व्हिडीओ
2 ‘मी सोनू सूदवर हात उचलू शकत नाही’, मेगास्टार चिरंजीवी यांचा खुलासा
3 सुशांतचे वडील रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Just Now!
X