स्टार प्रवाह वाहिनीचा ‘आता थांबायचं नाय’ हा विचार ‘नकुशी’ फेम अभिनेत्री प्रसिद्धी किशोरने आत्मसात केला आहे. स्वत:च्या कमाईतून कार घेण्याचं स्वप्न तिनं नुकतंच साकार केलं आहे.

वाचा : हे आहेत पुरस्कार सोहळ्यांमधील कतरिनाचे सर्वाधिक गाजलेले परफॉर्मन्स

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?

मालिकेत नकुशीची व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्धी किशोर मुळची नागपुरची आहे. तिची बहीण आणि बहिणीचे पती पुण्यात असल्याने प्रसिद्धीने पुण्यात स्वकमाईतून नवीकोरी कार घेतली. प्रसिद्धी शूटिंगमध्ये बिझी असल्याने कार घेण्याच्या औपचारिकता तिची बहीण आणि भावोजींनी पूर्ण केल्या. प्रसिद्धीने कधी काळी पाहिलेलं स्वप्न आता थांबायचं नाय म्हणत साकार केलं.

वाचा : अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या पोस्टने महापालिका प्रशासन खडबडून जागे

आपल्या नव्या कारविषयीचा आनंद व्यक्त करताना प्रसिद्धी म्हणाली की, ‘शूटिंगच्या अनियमित वेळा आणि स्वत:च्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मी कार घेण्याचा विचार केला. कार घेणे हे माझे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाल्याने मी प्रचंड आनंदात आहे. कार घेणे ही जबाबदारी असल्याने थोडी भीती वाटत होती. मात्र, आता घेतली नाही, तर कधीच घेता येणार नाही म्हणून आता थांबायचं नाय म्हणत कार घेतली. स्वकष्टातून हे स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमानही वाटतो. माझ्या स्वतंत्र होण्यात ‘नकुशी’चा मोठा वाटा आहे. मी कार घेतल्याचा माझ्या इतकाच आनंद माझ्या घरच्यांच्या डोळ्यातही आहे. माझे आई-वडील, बहीण आणि बाकी साऱ्यांच्याच पाठिंब्याने माझी इथवरची वाटचाल झाली.’

nakushi