24 February 2019

News Flash

Video : ‘नमस्ते इंग्लंड’मधील पहिलंवहिलं गाणं प्रदर्शित

अर्जुन-परिणितीची जोडी सहा वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत.

तेरे लिए, नमस्ते इंग्लंड

अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून यामधून अर्जुन-परिणितीची धम्माल केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यातच आता भर पडली आहे ती या चित्रपटातील नव्या गाण्याची. या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

‘इश्कजादे’ या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर केलेली अर्जुन-परिणितीची जोडी सहा वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटातील ‘तेरे लिए’ हे पहिलंवहिलं गाणं प्रदर्शित झालं असून ते प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘तेरे लिए’ या गाण्याला आतिफ असलम आणि आकांक्षा भंडारी यांचा आवाज लाभला असून जावेद अख्तर यांनी या गाण्याची रचना केली आहे. त्याप्रमाणेच मनन शाह यांनी हे गाणं कंपोज केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून जस्मीतची (परिणिती) आणि परम (अर्जुन) यांची प्रेमकथा रंगविण्यात आली आहे.

दरम्यान, हा चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये करिअर घडविण्यासाठी देश सोडून इंग्लंडला गेलेल्या जस्मीतची आणि तिच्या प्रेमळ नवऱ्याची कथा सांगण्यात आली आहे.

First Published on September 11, 2018 12:56 pm

Web Title: namaste england first song titled tere liye