नवऱ्यासाठी त्याची बायको ही त्याला समजून घेणारी त्याच्या आयुष्यातील अतिशय प्रिय व्यक्ती असते. आता याच प्रिय व्यक्तीचं म्हणजेचं बायकोचं मनं जिंकण्यासाठी कलर्स मराठी त्यांच्या ‘नवऱ्यासाठी’ एक अनोखं आव्हान घेऊन आले. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा खानविलकर करत आहेत. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदाशी मनमोकळेपणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. येत्या रविवारी एका तासाचा ‘मकरसंक्रांत’ विशेष भाग कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणार असून यामध्ये महाराष्ट्राच्या दोन लाडक्या अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि नम्रता आवटे यांनी कार्यक्रमामध्ये आपापल्या नवऱ्यासोबत हजेरी लावली. दोघींनी कार्यक्रमामध्ये भरपूर गप्पा मारल्या आणि धम्माल मस्ती देखील केली.

वाचा : ..अन् सई-अमृता आल्या एकत्र!

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 

विशाखा सुभेदार आणि तिच्या ‘अहोंनी’ त्यांचा लग्नाआधीचा प्रवास सांगितला. त्यांची भेट कशी झाली, कसे ते एकमेकांच्या प्रेमात पडले, कसं त्यांचं लग्न झालं हे त्यांच्या अहोंनी खूपच गमतीशीरित्या सांगितले. विशाखा आपल्या नात्याबद्दल, नवऱ्याबद्दल सांगताना थोडीशी भावूक झाली. जेव्हा मला माझ्या नवऱ्याची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा त्याने माझी साथ दिली. प्रत्येक क्षणी माझा नवरा माझ्यासोबत असायचा, माझ्यापाठी तो खंबीरपणे उभा राहिला असं विशाखाने सांगितले. आणि शेवटी न राहून विशाखासुद्धा ‘नवरा असावा तर असा’ असं म्हणाली.

वाचा : अखेर ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’साठी प्रभू आला धावून

तसेच, नम्रता आवटे आणि तिच्या नवऱ्याने देखील त्यांच्या नात्यातील काही महत्वाच्या गोष्टी कार्यक्रमामध्ये सांगितल्या. माझी खूप काळजी घेणारा आणि मला कधीही गरज लागली तर कुठेही आणि कुठल्याही क्षणी पोहचणारा नवरा मला मिळाला आहे याचं मला कौतुक आणि आदर वाटतो. नम्रताच्या कामाबद्दल कौतुक करताना तिचे अहो म्हणाले, ‘मी नम्रताचं गिरगाव व्हाया दादर’ हे नाटकं बघितलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं.’ अश्या अनेक आठवणी आणि खास क्षण या दोघींनी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या.