News Flash

माय-लेकाचा भन्नाट डान्स; नताशाने शेअर केला अगस्त्यचा नवा व्हिडीओ

पाहा, नताशा- अगस्त्यचा डान्स

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक ही सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अलिकडेच नताशाने असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

नताशाने तिचा मुलगा अगस्त्य सोबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत नताशा अगस्त्य सोबत डान्स करतांना दिसते. या व्हिडीओत नताशा अगस्त्य सोबत हृतिक आणि टायगरच्या ‘वॉर’ चित्रपटातील जय जय शिव शंकर या गाण्यावर डान्स करतांना दिसते. नताशाने फ्लोरल प्रिंटचा टॉप घातला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.


दरम्यान, नताशा आणि हार्दिक पांड्या याचा मुलगा अगस्त्यचा जन्म जून महिन्यात झाला आहे. नताशाने ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर नताशा ‘बिग बॉसच्या ८’ पर्वची सदस्य होती. त्यानंतर तिला खरी ओळख ही ‘नच बलीये’ या रिअॅलिटी शोमधून मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 7:15 pm

Web Title: natasha stankovic shared a video with son agastya dcp98
Next Stories
1 पुन्हा एकदा निया शर्माने केलं बिकिनी फोटोशूट; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
2 राजवीरला कळेल का पियूची खरी ओळख? ‘कारभारी लय भारी’मध्ये येणार नवा ट्विस्ट
3 ‘अर्जुन तू आसपास असतोस तेव्हा’… काय म्हणाली हे मलायका
Just Now!
X