News Flash

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : कंगना रणौतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार

‘मणिकर्णिका’, 'पंगा'साठी मिळाला पुस्कार

फोटो ट्विटरवरुन साभार

अभिनेत्री अभिनेत्री कंगना रणौतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांविरोधात दिलेल्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’मध्ये कंगाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका बजावली होती. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र कंगानाच्या अभिनयाचं यामधून कौतुक झाल्याचं पाहयला मिळालं. त्याचप्रमाणे पंगा हा चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये कंगनाने जया निगम या महिला कब्बडी खेळाडूची भूमिका साकारली आहे.

यापूर्वी कंगनाला २००८ साली मधुर भंडारकर दिग्दर्शित फॅशन चित्रपटासाठी सर्वोत्तमच सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच २०१४ साली क्वीन तर २०१५ साली तन्नू वेड्स मन्नू चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला. त्याचप्रमाणे तिला २००६ च्या गँगस्टर चित्रपाटासाठी पदार्पण करणारी सर्वोत्त अभिनेत्री, फॅशनसाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, क्विनसाठी सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम अभिनेत्री (क्रिटीक) असे चार फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. कंगनाला भारत सरकारने पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान देऊनही यापूर्वीच गौरवलं आहे.  कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी कंगनाला भारत सरकारने हा पुरस्कार प्रदान केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 4:57 pm

Web Title: national film awards 2019 kangana ranaut best actress for manikarnika panga scsg 91
Next Stories
1 कार्तिक आर्यनला करोनाची लागण; सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली माहिती
2 Birthday special: ‘थलायवी’साठी कंगनाचा कायापालट, वाढवलं 20 किलो वजन
3 सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा बोहल्यावर!; हिच्याशी बांधणार लग्नगाठ
Just Now!
X