05 August 2020

News Flash

‘नवरी मिळे नवऱ्याला’ फेम सायली देवधर अडकली लग्नबंधनात

'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' यांसारख्या मालिकांमधून सायली घराघरांत पोहोचली.

सायली देवधर, गौरव बुरसे

मराठी चित्रपटसृष्टीतल्या आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. ‘लेक माझी लाडकी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सायली देवधर विवाहबद्ध झाली आहे. गायक-संगीतकार गौरव बुरसे याच्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट या विवाहसोहळ्याची काही क्षणचित्रे पोस्ट केली आहेत.

पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. ‘काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. हे ही असंच काही. शब्द सापडत नाहीत आणि सापडले तरी व्यक्त व्हायला पुरत नाहीत,’ अशी कॅप्शन सायलीने गौरवसोबतच्या फोटोला दिली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सायलीचा साखरपुडा पार पडला.

View this post on Instagram

Throwback.. engagement..🥰

A post shared by Sayali Deodhar (@deodharsayali) on

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सायलीच्या लग्नाला हजेरी लावली. बॅचलर ग्रुपमधून आणखी एक बुरूज ढासळला, असं कॅप्शन प्राजक्ताने लग्नाच्या फोटोला दिलं.

View this post on Instagram

Bachelor group मधला आणखी एक बुरूज़ ढासळला… @deodharsayali 🎯 . Darling Whatever makes you happy; makes us happy ☺️ And we know how much you wanted this since so long… Heartiest congratulations girl 🥳❤️❤️❤️ . @gauravburse लग्नासाठी आजच्या दिवसाची निवड करून भविष्यातल्या “तू आपली anniversary कशी काय विसरलास?” ह्या संभाव्य वाक्याची शक्यताच नष्ट केल्याबद्दल तुमचेही अभिनंदन 😂 . @shraddha_kakade आता तुमचा नंबर🤪 @rachanaburse 🌿 #wedding #girlsgang #prajaktamali #saree #पैठणी

A post shared by Prajakta Mali (@prajakta_official) on

आणखी वाचा : ‘अप्सरा’ने केलं लग्न? उलट्या मंगळसूत्रावरून चर्चांना उधाण

सायली सध्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेत शरयूची भूमिका साकारत आहे. पुण्यातील अभिनव कला केंद्र येथून सायलीने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 6:45 pm

Web Title: navri mile navryala fame sayali deodhar ties knot with beau gaurav burse ssv 92
Next Stories
1 Mr India 2 मध्ये ‘मोगॅम्बो खुश हुआ’ म्हणणार ‘हा’ आघाडीचा अभिनेता
2 अन् नेहा कक्करनं दिली दोन-दोन हजारांच्या नोटेची भीक
3 अग्गंबाई सासूबाई : शुभ्रा-सोहमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री
Just Now!
X