19 September 2020

News Flash

नवाजुद्दीनच्या कुटुंबातील हा व्यक्ती करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

नवाजुद्दीन यामध्ये प्रियकराची भूमिका साकारणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी

रुपेरी पडद्यावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारल्यानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. विशेष म्हणजे या आगामी चित्रपटातून त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नवाजुद्दीनचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

‘बोले चुडियाँ’ असं या चित्रपटाचं नाव असून हा एक रोमॅण्टिक ड्रामा असणार आहे. नवाजुद्दीन यामध्ये प्रियकराची भूमिका साकारणार आहे. वुडपिकर मुव्हिजचे राजेश भाटिया आणि किरण भाटिया या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

वाचा : परीक्षेचा ताण दूर करू पाहणारा चित्रपट ‘१० वी’  

शमासने याआधी काही लघुपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हा रोमँटिक ड्रामा मी जगलो असून त्यावर खूप मेहनत घेतली आहे. त्यातच नवाजभाई भूमिका साकारणार असल्याने ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. प्रियकराच्या भूमिकेला ते न्याय देतील असा मला पूर्ण विश्वास आहे,’ असं शमास म्हणाला.

या रोमँटिक ड्रामामध्ये नवाजुद्दीनच्या प्रेयसीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे. मे महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 5:39 pm

Web Title: nawazuddin siddiqui brother shamas nawab siddiqui to debut as a director in bollywood
Next Stories
1 भाभीजी काँग्रेस मे है ! शिल्पा शिंदेचा राजकारणात प्रवेश
2 परीक्षेचा ताण दूर करू पाहणारा चित्रपट ‘१० वी’
3 सलमान खानमुळे मलायकाचा ‘दबंग ३’मधून पत्ता कट?
Just Now!
X