27 September 2020

News Flash

नवाजुद्दीन अन् भावात वादाची ठिणगी; भावाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शमस सिद्दीकीने निर्मात्यांना मेसेज करून सांगितले की...

नवाजुद्दीन सिद्दिकी, शमस सिद्दिकी

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याचा भाऊ शमस सिद्दीकी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या वादाचं कारण म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट बोले चुडियाँ. शमस या चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय आणि त्यात नवाजुद्दीनची मुख्य भूमिका आहे. मात्र या चित्रपटावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि आता या दोघांनी भविष्यात एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवाजुद्दीन आणि शमसने यापुढे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शमसने काही चित्रपट निर्मात्यांना मेसेजसुद्धा पाठवला आहे की तो यापुढे नवाजुद्दीनचं काम सांभाळणार नाही. नवाजुद्दीन चित्रपटसृष्टीत आल्यापासून शमस त्याच्या मॅनेजरचं काम पाहत होता. मात्र या वादामुळे आता दोघांनी स्वतंत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : नेहासोबत लग्नाच्या चर्चांनंतर आदित्यने घेतलं छोट्या पडद्यावरुन ब्रेक

‘नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बिझनेस मॅनेजर या पदाचा मी राजीनामा दिला आहे. माझे आणि त्याचे व्यावसायिक नाते संपलेले आहेत’, असा मेसेज शमसने निर्मात्यांना पाठवला आहे. या वादाच्या ठिणगीमुळे आता ‘बोले चुडियाँ’ या चित्रपटाचं भवितव्य अंधारातच दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 12:11 pm

Web Title: nawazuddin siddiqui parts ways with his brother shamas ssv 92
Next Stories
1 Video : शिल्पा शेट्टीने दिल्या बिग बींच्या स्टाइलमध्ये होळीच्या शुभेच्छा
2 #Sooryavanshi: “…तुला कोणीही पाहणार नाही”, रोहित शेट्टीच्या ‘त्या’ वक्तव्यावर कतरिनाने दिलं उत्तर
3 ओळखा कोण आहे हा चिमुकला? आता आहे बॉलिवूडमधला सुप्रसिद्ध अभिनेता
Just Now!
X