News Flash

‘गणेश गायतोंडे’ लवकरच मराठीत

गेल्या पाच-सहा वर्षांपासून मराठी चित्रपटांचा खूप चांगला काळ सुरु असल्याचं नवाजुद्दीन म्हणाला.

नवाजुद्दीन सिद्दीकी

विभिन्न भूमिकांद्वारे आपल्या दमदार अभिनय कौशल्याचं प्रदर्शन करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आता कौटुंबिक चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. नवाजुद्दीनचे बरेचसे चित्रपट आणि ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिजसुद्धा खास करून प्रौढांसाठीच्या विषयांवरील असल्याचं पाहायला मिळालं. पण त्याचा आगामी ‘मोतीचूक चकनाचूर’ हा कौटुंबिक चित्रपट असून त्यात तो पूर्णपणे रोमँटिक भूमिकेत आहे. रोमँटिक हिरो म्हणून तो पहिल्यांदाच या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना नवाजुद्दीनने येत्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत झळकणार असल्याची माहिती दिली.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो मराठी चित्रपटांविषयी म्हणाला, ”गेल्या पाच-सहा वर्षांपासून मराठी चित्रपटांचा खूप चांगला काळ सुरु आहे. उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हल्ली तरुण दिग्दर्शक मराठीत खूप चांगले चित्रपट आणत आहेत. लवकरच मी एका मराठी चित्रपटात तुम्हाला दिसेन.” हे सांगताना त्या चित्रपटाविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

आणखी वाचा : ..म्हणून सलमान- ऐश्वर्याचे लग्न होऊ शकले नाही

या मुलाखतीत त्याने चांगल्या मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळायला हव्यात, असं मत मांडलं. ”माझ्या सर्वांत आवडत्या चित्रपटांच्या यादीत सर्वाधिक मराठी चित्रपट आहेत. ‘श्वास’, ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘कोर्ट’ यांसारख्या चित्रपटांना थिएटरमध्ये स्क्रीन्स मिळायल्या हव्यात”, असं तो म्हणाला. त्याचप्रमाणे भविष्यात गणेश गायतोंडेपेक्षाही मोठी भूमिका मिळाल्यास पुन्हा एकदा वेब सीरिजमध्ये काम करण्याच नक्की विचार करेन असं त्याने सांगितलं.

‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी नवाजुद्दीनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 12:07 pm

Web Title: nawazuddin siddiqui will be seen in marathi cinema very soon ssv 92
Next Stories
1 ”माझ्या पतीला फोन केला अन् म्हणाला..”; सोना मोहपात्राचे सोनू निगमवर गंभीर आरोप
2 प्रियांका चोप्रा म्हणते, “ही गोष्ट खाल्ल्याशिवाय माझं जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही”
3 ..म्हणून सलमान- ऐश्वर्याचे लग्न होऊ शकले नाही