News Flash

बोटिंगला गेलेल्या अभिनेत्रीचा मृत्यू; आठवड्याभरानंतर सापडला मृतदेह

चार वर्षांच्या मुलासोबत गेली होती बोटिंग करायला

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेरा बोटिंगला गेली असता बेपत्ता झाली होती. अखेर सोमवारी तिचा मृतदेह सापडला आहे. ८ जुलै रोजी ती सकाळी कॅलिफोर्नियातील पिरु तलावात बोटिंगसाठी गेली होती. मात्र या तलावात फिरताना ती अचानक गायब झाली होती. या तलावाच्या ईशान्य भागात तिचा मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नाया ३३ वर्षांची होती.

बोटिंग करताना नायासोबत तिचा चार वर्षांचा मुलगादेखील होता. तिचा मुलगा बोटीमधून किनाऱ्यावर परतला मात्र नाया गायब झाली होती. “आई आणि मी बोटीतून फिरायला गेलो होतो. तलावात गेल्यावर आम्ही दोघांनी पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली. त्यानंतर आईने मला पुन्हा बोटीत चढण्यासाठी मदत केली. पण बोटीत आल्यावर जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा आई दिसलीच नाही”, अशी माहिती तिच्या चार वर्षीय मुलाने दिली.

नायाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नाया बेपत्ता झाल्याची माहिती कळताच आठवडाभरापासून पोलीस स्कूबा एक्स्पर्ट आणि हॅलिकॉप्टर्सच्या साहाय्याने तिचा शोध घेत होते.

नायाच्या अशा एकाएकी मृत्यूमळे हॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 10:13 am

Web Title: naya rivera body of missing actress found in california lake ssv 92
Next Stories
1 …म्हणून विमानतळावर लिसा हेडन आणि जॅकलीनमध्ये जुंपली
2 सारा अली खानच्या कारचालकाला करोनाची लागण
3 बिग बींसाठी केलेल्या ट्विटमध्ये जूहीने लिहिले ‘आयुर्वेद’, ट्रोल झाल्यावर दिले स्पष्टीकरण
Just Now!
X